एलबीटीप्रश्नी महापालिकेकडून २५ व्यापाऱ्यांवर फौजदारी
By Admin | Updated: December 15, 2014 23:57 IST2014-12-15T23:43:30+5:302014-12-15T23:57:18+5:30
गेल्या दीड वर्षात एलबीटी कायद्याअंतर्गत महापालिकेकडे ९ हजार व्यापाऱ्यांनी नोंदणी केली आहे.

एलबीटीप्रश्नी महापालिकेकडून २५ व्यापाऱ्यांवर फौजदारी
सांगली : स्थानिक संस्था कर (एलबीटी) विरोधात व्यापाऱ्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले असताना, पालिकेने कर चुकविणाऱ्या व्यापाऱ्यांवरील फौजदारी कारवाई सुरूच ठेवली आहे. आज, सोमवारी आणखी २५ जणांवर न्यायालयात फौजदारी दाखल करीत व्यापाऱ्यांचे आंदोलन बेदखल केले. महापालिकेने धडक कारवाई सुरूच ठेवल्यामुळे व्यापारीवर्गात खळबळ उडाली आहे.
गेल्या दीड वर्षात एलबीटी कायद्याअंतर्गत महापालिकेकडे ९ हजार व्यापाऱ्यांनी नोंदणी केली आहे. यातील केवळ २ हजार व्यापारीच नियमितपणे कर भरत आहेत. अन्य व्यापाऱ्यांनी करावर बहिष्कार टाकल्यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती खालावली आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन दोन महिने रखडले असून, विकासकामांनाही निधीची तरतूद करण्याची अडचण निर्माण झाली आहे. यापूर्वी राजकीय कारणावरून व्यापाऱ्यांवर कारवाईचा हात आखडता घेणाऱ्या पालिका प्रशासनाने विधानसभा निवडणुकीनंतर मात्र कारवाईचा धडाका लावला आहे. कर चुकविणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात कायद्यानुसार कारवाईचे हत्यार उपसले आहे. कारवाई करण्यापूर्वी महापालिकेने संबंधित व्यापाऱ्यांना याबाबत सूचना दिली होती तसेच व्यापाऱ्यांना नोटिसा काढून सुनावणीलाही बोलावले होते; पण सुनावणीला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. व्यापाऱ्यांच्या (पान १० वर)