शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
4
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
5
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
6
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
7
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
8
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
9
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
10
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
11
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
14
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
15
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
16
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
17
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
18
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
19
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
20
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!

Kolhapur: जप्ती टाळण्यासाठी वकिलाने घेतली १ लाख ८० हजारांची लाच, सीबीआयसह एसीबीच्या पथकाने रंगेहाथ केली अटक 

By उद्धव गोडसे | Updated: December 11, 2024 13:47 IST

सीबीआयकडून झालेली कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलीच कारवाई

कोल्हापूर : थकीत कर्जापोटी बँकेकडून होणारी जप्तीची कारवाई तात्पुरती टाळण्यासाठी अडीच लाखांच्या लाचेची मागणी करून १ लाख ७० हजार रुपये स्वीकारणारा इंडियन बँकेचा कायदा सल्लागार ॲड. विजय तुकाराम पाटणकर (वय ३८, रा. इचलकरंजी) याला अटक झाली. सीबीआय आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि. १०) रात्री इचलकरंजी येथे कारवाई केली. या कारवाईने इचलकरंजीसह जिल्ह्यात खळबळ उडाली.तक्रारदारांनी इंडियन बँकेच्या इचलकरंजी शाखेकडून कर्ज घेतले होते. सुमारे साडेपाच कोटी रुपयांचे कर्ज थकीत असल्याने त्यांच्या घरावर जप्तीची कारवाई करण्याची नोटीस बँकेने पाठवली होती. मात्र, घरात मंगलकार्य असल्याने जप्ती पुढे ढकलावी, अशी विनंती तक्रारदारांनी बँकेचे कायदा सल्लागार ॲड. पाटणकर याच्याकडे केली. जप्ती पुढे ढकलण्यासाठी पाटणकर याने अडीच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. अखेर १ लाख ८० हजार रुपयांवर तडजोड झाली. याबाबत तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात धाव घेऊन तक्रार दिली. राष्ट्रीयकृत बँकेच्या कायदा सल्लागाराच्या विरोधात तक्रार असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती पुणे येथील सीबीआयच्या अधिका-यांना दिली. तक्रारीची पडताळणी करून तातडीने मंगळवारी रात्री इचलकरंजी येथील बीएसएनएल कार्यालय परिसरातील वकिलाच्या कार्यालयात सापळा रचण्यात आला. लाचेची १ लाख ७० हजारांची रक्कम घेताना ॲड. पाटणकर रंगेहाथ सापडला. तो सध्या सीबीआयच्या अटकेत असून, त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली.कारवाईने खळबळबँकेच्या कायदा सल्लागारावर कारवाई होण्याचा हा पहिलाच प्रकार असावा. जप्ती टाळण्यासाठी वकिलानेच मोठ्या रकमेची लाच घेतल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. राष्ट्रीयकृत बँकेचा सल्लागार असल्याने याचा पुढील तपास सीबीआयकडून सुरू आहे. लाचखोरीबद्दल सीबीआयकडून झालेली ही जिल्ह्यातील पहिलीच कारवाई असल्याची माहिती अधिका-यांनी दिली. साताऱ्यात चक्क न्यायाधीशाला लाच घेताना बुधवारीच पकडण्यात आले आणि इकडे इचलकरंजीत वकिलास पकडले. न्याययंत्रणेशी संबंधित या कारवाईचा अनेकांना धक्का बसला. साताऱ्याची कारवाई झाल्यावर वकिलांना आनंद झाला, परंतु तोपर्यंत वकिलासही पकडल्याचे वृत्त आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBribe Caseलाच प्रकरणCBIगुन्हा अन्वेषण विभागAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागadvocateवकिल