जगातील पहिल्या स्पोर्टी रेनो काइगरचे कोल्हापूरमध्ये लाॅंचिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:13 IST2021-02-05T07:13:23+5:302021-02-05T07:13:23+5:30
कोल्हापूर : जगातील पहिल्या स्पोर्टी रेनो काइगरचे गुरुवारी राष्ट्रीय महामार्गावरील नागाव येथील रेनाॅल्ट कोल्हापूरमध्ये मोठ्या थाटामाटात लाॅंचिंग झाले. रेनाे ...

जगातील पहिल्या स्पोर्टी रेनो काइगरचे कोल्हापूरमध्ये लाॅंचिंग
कोल्हापूर : जगातील पहिल्या स्पोर्टी रेनो काइगरचे गुरुवारी राष्ट्रीय महामार्गावरील नागाव येथील रेनाॅल्ट कोल्हापूरमध्ये मोठ्या थाटामाटात लाॅंचिंग झाले.
रेनाे काइगर ही बी-एसयुव्ही सेगमेंटमधील स्पोर्टी कार आहे. लक्षवेधी डिझायन, नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञाने सज्ज असलेल्या या कारमध्ये नवीन ग्लोबल इंजिन, नवीनोत्तम टर्बो पेट्रोल इंजिन, स्मार्ट केबीन, प्रवाशांना बसण्यासाठी भरपूर स्पेस, केबीन स्टोरेज आणि कार्गोची सुविधा उपलब्ध आहे. असा शहरी आधुनिकेचा सुंदर मिलाप या कारमध्ये आहे. अशा बहुचर्चित कारची कोल्हापूरसह भारतातील कार शौकिनांना प्रतीक्षा होती. ही प्रतीक्षा गुरुवारपासून संपली असून, ही कार आता कोल्हापुरातील नागाव (ता. हातकणगले) येथील रेनाॅल्ट कोल्हापूरमध्ये बुकिंग सुरू असून, विक्रीसाठी लवकरच उपलब्ध होत आहे.
फोटो : २८०१२०२१-कोल-रेनाॅल्ट काइगर