किणी : पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर किणी (ता. हातकंणगले) येथील टोल नाक्यावर ३२ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचा प्रारंभ राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पदरकर यांच्या हस्ते करण्यात आला. रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत दिशादर्शक फलकावरील सूचनांचे व वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघात टाळण्यासाठी मदत होईल. तसेच अपघात झालाच तर जखमींवर कोणते प्राथमिक करावे, याची प्रात्यक्षिक स्वरूपात माहिती यावेळी देण्यात आली. अपघात टाळण्यासाठी दिशादर्शक चिन्हांचा वापर करावा, असे आवाहन सुरक्षा सल्लागार डाॅ. अर्चना मानकर पाटील यांनी केले.
यावेळी महामार्गावर वाहनधारकांना माहिती पुस्तकांचे वाटप व वाहतूक नियमांची माहिती व अपघातानंतर जखमींना प्रथम उपचारासाठी आवश्यक गोष्टी यांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी रस्ते विकास महामंडळाचे प्रकाश करडे, समाधान पाटील, संजोग डोंगर, रनोज मल्लिक, प्रवीण भालेराव, प्रताप भोईटे यांच्यासह राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व राज्य रस्ते विकास महामंडळाचे जयहिंद टोल नाक्यावरील कर्मचारी, वाहनधारक उपस्थित होते.
फोटो २९ किणी रोड सुरक्षा
पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर किणी येथील टोलनाक्यावर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व राज्य रस्ते विकास महामंडळाकडून रस्ता सुरक्षा अभियानाचा प्रारंभ राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पदरकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रकाश करडे, समाधान पाटील, प्रवीण भालेराव आदी उपस्थित होते.