कागलमध्ये शनिवारी 'माझा व्यवसाय, माझा हक्क’ उपक्रमास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:03 IST2021-02-05T07:03:30+5:302021-02-05T07:03:30+5:30
कागल : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत 'माझा व्यवसाय- माझा हक्क' या स्वयंरोजगाराची संधी निर्माण करून देणाऱ्या शासकीय उपक्रमाचा प्रारंभ ...

कागलमध्ये शनिवारी 'माझा व्यवसाय, माझा हक्क’ उपक्रमास प्रारंभ
कागल
: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत 'माझा व्यवसाय- माझा हक्क' या स्वयंरोजगाराची संधी निर्माण करून देणाऱ्या शासकीय उपक्रमाचा प्रारंभ कागल येथे उद्या, शनिवारी होणार आहे, अशी माहिती या कार्यक्रमाचे संयोजक, हसन मुश्रीफ फाउंडेशनचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी दिली. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणारा पश्चिम महाराष्ट्रातील हा पहिलाच स्वयंरोजगार मेळावा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कागल, गडहिंग्लज, उत्तूर विधानसभा मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी निर्माण करून देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमानंतर फॉर्म भरून घेतले जाणार आहेत. या उपक्रमांतर्गत फिरत्या व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असून, विविध उपयोगी कामांसाठी टाटा एस (छोटा हत्ती) उपलब्ध करून देण्यासाठी नावनोंदणी होणार आहे.
चौकट.
असा आहे उपक्रम.... या उपक्रमांतर्गत बेरोजगार युवकांना कृषीविषयक वाहतूक, फळभाज्या, चाट, नाश्ता, जेवण यांसह आठवडी बाजारातील विविध विक्री व्यवसाय करता येतील. त्यासाठी शासकीय अनुदान, कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. अधिक माहितीसाठी कागल येथील हसन मुश्रीफ फौंडेशनशी संपर्क साधावा.
○ कृपया या बातमीत मंत्री हसन मुश्रीफ यांचा फोटो वापरावा.