शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

एकदा ठरलं.. राहुल पाटील ‘हाता’त ‘घड्याळ’ बांधणार; मुंबईत घेतली अजित पवार यांची भेट, याच महिन्यात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 17:07 IST

कोल्हापूर : हयातभर काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेले दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, ...

कोल्हापूर : हयातभर काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेले दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, राजेश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीच त्यांनी गुरुवारी भल्या सकाळी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांच्या निवासस्थानी ‘देवगिरी’वर भेट घेतली. यावेळी जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते.दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या जवळचे मानले गेलेले पी. एन. पाटील यांचे गतवर्षी निधन झाले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राहुल पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली. परंतु, ते शिंदेसेनेच्या चंद्रदीप नरके यांच्याकडून पराभूत झाले. पी. एन. यांच्या नेतृत्वाखालील कार्यरत होता तो भोगावती साखर कारखाना सध्या आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे. राजीव गांधी सूतगिरणीलाही मदतीची गरज आहे.

मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी राहुल पाटील हे भाजप किंवा राष्ट्रवादीत जातील, अशा हालचाली सुरू होत्या. त्यातून पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. याच महिन्यात मोठा मेळावा घेऊन अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्ये पाटील यांचा प्रवेश कार्यक्रम घेण्याचेही यावेळी निश्चित करण्यात आले.यावेळी श्रीपतराव बोंद्रे बॅंकेचे अध्यक्ष राजेश पाटील, ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे, माजी संचालक पी. डी. धुंदरे, सत्यजित पाटील, भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवाजी पाटील, संचालक ए. डी. चौगुले, करवीर काँग्रसेचे तालुकाध्यक्ष शंकरराव पाटील, चेतन पाटील, बी. एच. पाटील वडणगे, भारत पाटील भुयेकर, हंबीरराव वळके, यशवंत बॅंकेचे संचालक दत्तात्रय पाटील उपस्थित होते.

गेले पंधरा दिवस करवीर, गगनबावडा, राधानगरी तालुका आणि कोल्हापूर शहरातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली. करवीर विधानसभा मतदारसंघातील विकासकामांना आणखी जोर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा, असा सर्वांचाच आग्रह होता. त्यानुसार निर्णय घेतला. -  राहुल पाटील