शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

महामॅरेथॉन नाव नोंदणी अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 11:36 IST

‘सर्वाधिक बक्षिसांची स्पर्धा’ म्हणून गणल्या गेलेल्या ‘लोकमत महामॅरेथॉन’ कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटकातील अनेक धावपटूंसह सर्वसामान्य नागरिकांनीही नावनोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणीचा अंतिम काउंटडाऊन सुरूझाला आहे. नावनोंदणीची अंतिम मुदत उद्या, शनिवारपर्यंत आहे.

ठळक मुद्देमहामॅरेथॉन नाव नोंदणी अंतिम टप्प्यातआता नाही तर कधी नाही; सहभागाबाबत मोठी उत्सुकता

कोल्हापूर : ‘सर्वाधिक बक्षिसांची स्पर्धा’ म्हणून गणल्या गेलेल्या ‘लोकमत महामॅरेथॉन’ कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटकातील अनेक धावपटूंसह सर्वसामान्य नागरिकांनीही नावनोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणीचा अंतिम काउंटडाऊन सुरूझाला आहे. नावनोंदणीची अंतिम मुदत उद्या, शनिवारपर्यंत आहे.‘लोकमत महामॅरेथॉन’च्या तिसऱ्या पर्वासाठी धुमधडाक्यात सुरूअसलेली नोंदणी अंतिम टप्प्यांत आली आहे. कोल्हापुरात गेले दोन वर्षांपासून ‘लोकमत महामॅरेथॉन’ला उदंड प्रतिसाद लाभला. आबालवृद्ध तंदुरुस्त राहावेत, या हेतूने ही स्पर्धा आयोजित केली जाते.पोलीस क्रीडांगणातून ५ जानेवारी २०२० रोजी पहाटे पाच वाजता ‘लोकमत मॅरेथॉन’ची सुरुवात होणार आहे. या महामॅरेथॉनमध्ये १२ वर्षांपेक्षा जास्त आणि धावण्याचा छंद असणाऱ्यांसाठी ‘फन रन’, १६ वर्षांपेक्षा जास्त वर्षांवरील व्यक्तींसाठी १० किलोमीटरची ‘पॉवर रन’ होणार आहे. १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी २१ किलोमीटरचा गट आणि तीन किलोमीटरची ‘फॅमिली रन’ आणि पाच किलोमीटर अंतराचा स्वतंत्र गट आहे. सर्व वयोगटांतील व्यक्तींना त्यामध्ये सहभागी होता येईल. सैन्य आणि पोलीस दलातील धावपटूंसाठी २१ किलोमीटरचा ‘डिफेन्स’ हा वेगळा गट आहे.विविध पाच गटांमध्ये होणाऱ्या मॅरेथॉनमधील विजेत्यांना एकूण सहा लाखांची बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. त्यासह धावपटूंना आकर्षक मेडलही मिळणार आहे. वैयक्तिक आणि ग्रुपच्या स्वरूपात धावपटू, नागरिकांना या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होता येईल. सहभागी होणाऱ्यांना ग्रुप रजिस्ट्रेशन करण्याची संधी उपलब्ध आहे. कोल्हापूरमधील या महामॅरेथॉनच्या ‘सीझन-३’साठी लवकरात लवकर नोंदणी करा.ग्रुप बुकिंगवर विशेष सवलत...‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये ग्रुप बुकिंगवर विशेष सवलत देण्यात येणार आहे. तरी इच्छुक शाळा, महाविद्यालय, खासगी संस्था, बँका, विविध सामाजिक संस्था यांनी एकत्र बुकिंग केल्यास त्यांना विशेष सवलत दिली जाणार आहे. ग्रुप बुकिंगवर त्यांच्या ग्रुपचे फोटोही ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध केले जाणार आहेत.

खंडपीठाचा प्रश्न जनमानसापर्यंत रुजविण्यासाठी आम्ही लोकमत महामॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहोत. आजच्या जमान्यात आपण चालणे, धावणे पूर्णपणे विसरलो आहे. ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या निमित्ताने नागरिकांना धावण्याची उत्कृ ष्ट संधी मिळाली आहे.अ‍ॅड. रणजित गावडे, अध्यक्ष जिल्हा बार असोसिएशन

 

‘लोकमत’च्या महामॅरेथॉनमुळे आम्हाला अशा प्रकारच्या स्पर्धेत सहभागी होण्याची प्रेरणा मिळाली. आजच्या धकाधकीच्या युगात फिटनेस टिकविण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन होणे गरजेचे आहे. ‘लोकमत’ची महामॅरेथॉन स्पर्धा ही राज्यात अव्वल व दर्जेदार म्हणून गणली जात आहे.- अरुण चौगले, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी

अधिक माहितीसाठी येथे संपर्क साधाया महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी  वेबसाईटवर आॅनलाईन रजिस्ट्रेशन करता येईल किंवा लोकमत शहर कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर; मोबाईल नंबर ९६३७३३०७०० अथवा ९७६७२६४८८५ वर संपर्क साधावा. या महामॅरेथॉनच्या ‘सीझन-२’ ला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता पुन्हा एकदा कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्र मॅरेथॉनमय होणार आहे.

 

  • ३ किलोमीटर (फॅमिली रन) ४०० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, मेडल, ब्रेकफास्ट
  • ५ किलोमीटर (फन रन) ५०० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, मेडल, ब्रेकफास्ट
  • १० किलोमीटर (पॉवर रन) ११०० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्ट
  • २१ किलोमीटर (हाफ मॅरेथॉन) ११०० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्ट
  • २१ किलोमीटर (डिफेन्स गट) १००० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्ट

 

 

टॅग्स :state transportएसटीkolhapurकोल्हापूर