राधानगरी : अमर रहे… अमर रहे… शहीद जवान अमर रहे, वंदे मातरम अशा घोषणा, भर पावसात अंत्ययात्रा काढून राधानगरी तालुक्यातील मिसाळवाडी येथील जवान साताप्पा गोविंद मिसाळ यांना गावकऱ्यांनी जड अंतकरणाने अखेरचा निरोप दिला. पंजाब येथील फिरोजपुर येथे सेवेत असताना मिसाळ यांचे आकस्मिक निधन झाले. काल, मंगळवारी मिसळवाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पाडले. यावेळी मिसाळ कुटुंबांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता. वाचा : सोनियाचा दिन आला; पण मिसाळवाडीचा लाडका साताप्पा गेला; वाघा बॉर्डरवर आले वीरमरणमंगळवारी सकाळी साताप्पा मिसाळ त्यांचे पार्थिव मिसाळवाडी येथे आणण्यात आले. गावकऱ्यांसह नातेवाईक त्यांच्या अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन वीर जवानाला अंतिम निरोप दिला. जवानाला शेवटचा निरोप देताना संपूर्ण मिसाळवाडी गावाने श्रद्धांजली अर्पण केली.यावेळी जिल्हा सैनिक कार्यालयाकडून सुभेदार मेजर सुहास कांबळे, नायब तहसीलदार सुभोध वायंगणकर , गोकुळचे संचालक अभिजीत तायशेटे, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर, पडळी गावचे सरपंच सुरेश पाटील, दीपक शेट्टी संभाजी आरडे, ए वाय पाटील, मोहन पाटील, राजेंद्र भाटळे, लक्ष्मीकांत हांडे, राधानगरी तालुक्यातील आजी-माजी सैनिक आदी मान्यवर उपस्थितीत होते.
Kolhapur: जवान साताप्पा मिसाळ यांना अखेरचा निरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 13:46 IST