सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रूग्णसंख्येत मोठी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 20:53 IST2021-03-20T20:52:10+5:302021-03-20T20:53:16+5:30
CoronaVirus Kolhapur- सलग तिसऱ्या दिवशी गेल्या २४ तासात कोल्हापूर जिल्हयात कोरोनाच्या रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असून नवे ८१ रुग्ण नोंदले गेले आहेत. यामध्ये कोल्हापूर शहरातील ४० रूग्णांचा समावेश आहे. एकूणच वाढती कोरोना रूग्णसंख्या पाहता उद्या जिल्हा प्रशासन याबाबत गांभिर्याने काही निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रूग्णसंख्येत मोठी वाढ
कोल्हापूर : सलग तिसऱ्या दिवशी गेल्या २४ तासात कोल्हापूर जिल्हयात कोरोनाच्या रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असून नवे ८१ रुग्ण नोंदले गेले आहेत. यामध्ये कोल्हापूर शहरातील ४० रूग्णांचा समावेश आहे. एकूणच वाढती कोरोना रूग्णसंख्या पाहता उद्या जिल्हा प्रशासन याबाबत गांभिर्याने काही निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गगनबावडा तालुक्यात एक, कागल तालुक्यात दोन, राधानगरी तालुक्यात दोन, हातकणंगले तालुक्यात दोन, करवीर तालुक्यात दहा, नगरपालिका क्षेत्रातील अठरा रूग्णांचा यामध्ये समावेश आहे.
दिवसभरात ४०५ जणांची तपासणी करण्यात आली असून, १,२२९ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. १४३ जणांची ॲन्टिजेन चाचणी करण्यात आली असून, ४६६ जणांवर उपचार सुरू आहेत. तर २४ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.