महाराणा प्रताप चौकातून लॅपटाॅप लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:13 IST2021-02-05T07:13:14+5:302021-02-05T07:13:14+5:30
कोल्हापूर : महाराणा प्रताप चौकात थांबलेल्या बोलेरो जीपमधील लॅपटॉप व बॅग चोरट्याने लंपास केली. गुरुवारी (दि. २७)दुपारी तीन वाजण्याच्या ...

महाराणा प्रताप चौकातून लॅपटाॅप लंपास
कोल्हापूर : महाराणा प्रताप चौकात थांबलेल्या बोलेरो जीपमधील लॅपटॉप व बॅग चोरट्याने लंपास केली. गुरुवारी (दि. २७)दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत सदाशिव यशवंत कुंभार (वय ५३, रा. फुलेवाडी) यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांत फिर्याद दिली. जीपचा दरवाजा उघडून चोरट्याने १० हजारांचे साहित्यही चोरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
-------
चाकूहल्ल्यात एकजण जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून गणेश बबन कोकरे (वय २९, रा. मोरेवाडी) याच्यावर दौलतनगर परिसरात दोघांनी चाकूहल्ला केला. त्यात तो जखमी झाला. याप्रकरणी अजित पाटील (रा. मोरेवाडी) व सुधीर मोरे (दौलतनगर) या संशयितांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
कोकरे व अजित पाटील यांच्यात पंधरा दिवसांपूर्वी भांडण झाले होते. याबाबत पोलिसांत तक्रार नव्हती. या भांडणाचा राग मनात धरून कोकरे व त्यांच्या नातेवाईकाला दौलतनगर परिसरात अडवून चाकू व ट्युबलाईटने मारहाण केली.