शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: आंबोली घाटात दरड कोसळली; रुग्णवाहिका अडकली, प्रवाशांनी वाट करुन दिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 13:01 IST

आंबोली/नृसिंहवाडी : वळवाच्या जोरदार पावसामुळे आंबोली-गोवा मार्गावर आंबोली धबधब्यापासून काही अंतरावर दरड कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली ...

आंबोली/नृसिंहवाडी : वळवाच्या जोरदार पावसामुळे आंबोली-गोवा मार्गावर आंबोली धबधब्यापासून काही अंतरावर दरड कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. दरम्यानच या मार्गावर रुग्णवाहिका अडकली. यावेळी प्रवाशांनी थांबून रस्त्यावरील दगड बाजूला करुन रुग्णवाहिकेला वाट करून दिली.जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे आंबोली धबधबा प्रवाहित झाला आहे. मान्सून सुरू झाल्यासारखी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असल्याने काहीसा गारठा जाणवत आहे. या पावसाने उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.साधारणता वळीव पाऊस सायंकाळी येऊन लगेच जात होता; मात्र यंदा वरुणराजाच्या मनात काही वेगळेच दिसत आहे. पावसाळ्यासारखे वातावरण झाले आहे. जुलै, ऑगस्टमधील पावसाचा अनुभव कोल्हापूरकरांना येत आहे. दिवसभर हवेत गारठा जाणवत होता. सततच्या पावसाने शेतीची कामे ठप्प झाली आहेत.हा पाऊस ऊस पिकांना पोषक असला तरी अनेक ठिकाणी उसाची लागणी भरणीचे काम थांबले आहे. मान्सून तोंडावर आल्याने पेरणीपूर्व मशागतीची कामे ठप्प झाली आहेत. भात, सूर्यफूल, भुईमूग ही पिके अद्याप शिवारातच उभी आहेत. त्यांची काढणी करता येत नसल्याने नुकसान होत आहे. आगामी तीन-चार दिवस पावसाचे असल्याचा अंंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसAmboli hill stationआंबोलि हिल स्टेशनlandslidesभूस्खलन