शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-सांगली चौपदरीकरण: भूसंपादनाचा मार्ग झाला मोकळा, लवकरच कामाला सुरुवात होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 13:37 IST

शिरोली सांगली हा रस्ता खासदार धैर्यशील माने यांच्या मागणीवरून केंद्रीय दळणवळण व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाकडे वर्ग करून घेतला

कोल्हापूर : कोल्हापूर-शिरोली-सांगली रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाल्याने लवकरच या रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. शिरोली सांगली हा रस्ता खासदार धैर्यशील माने यांच्या मागणीवरून केंद्रीय दळणवळण व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाकडे वर्ग करून घेतला आहे.या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ हा नंबर देण्यात आला आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झाल्यानंतर चौपदरीकरणाच्या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांकडून सर्वेक्षण करून त्याचा डीपीआर बनवण्यात आला आहे. या डीपीआरनुसार रस्त्यासाठी काही प्रमाणात भूसंपादन करावे लागत होते. भूसंपादनाच्या अंतिम मंजुरीसाठीचा प्रस्ताव प्रलंबित असल्याचे लक्षात घेऊन खासदार माने यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी दिल्लीत असताना नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाचे चेअरमन संतोष कुमार यादव यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भूसंपादनाच्या प्रलंबित प्रस्तावाला तातडीने मंजुरी देऊन कामास सुरुवात करावी, अशी लेखी मागणी केली.या मागणीची दखल घेत नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाने भूसंपादनाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे बरीच वर्षे प्रलंबित असलेल्या शिरोली सांगली रस्त्याच्या चौपदरीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSangliसांगलीhighwayमहामार्ग