शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

साखर, तांदळाच्या अमिषाने महिलेचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 19:17 IST

Crime News Kolhapur- मोफत तांदूळ, साखर देण्याचे अमिष दाखवून सुमारे ३३ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन महिलेचे लुबाडणूक करण्याची घटना घडली. याप्रकरणी संजीवनी यशवंत लोंढे (वय ५० रा. अंबाबाई मंदीरजीक, कंदलगाव, ता. करवीर) असे फसलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांनी अनोळखी ४० वर्षीय महिलेवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

ठळक मुद्देसाखर, तांदळाच्या अमिषाने महिलेचे दागिने लंपास नागाळा पार्क, गंगावेशमधील प्रकार : अज्ञात महिलेवर पोलिसांत गुन्हा

कोल्हापूर : मोफत तांदूळ, साखर देण्याचे अमिष दाखवून सुमारे ३३ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन महिलेचे लुबाडणूक करण्याची घटना घडली. याप्रकरणी संजीवनी यशवंत लोंढे (वय ५० रा. अंबाबाई मंदीरजीक, कंदलगाव, ता. करवीर) असे फसलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांनी अनोळखी ४० वर्षीय महिलेवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संजीवनी लोंढे यांची एका महिलेशी स्टेशन रोडवर भेट झाली. त्यावेळी त्या अनोळखी महिलेने लोंढे यांचा विश्वास संपादन करून त्यांना मोफत तांदूळ व साखर देण्याचे अमिष दाखवले. त्या महिलेने लोंढे यांना रिक्षातून घेऊन प्रथम नागाळा पार्क येथील एका दुकानात नेले. ते दुकान बंद असल्याने त्यांना पुन्हा गंगावेशमधील एका दुकानात नेले. तेथे त्यांनी लोंढे यांना तुमच्या अंगावर सोन्याचे दागिने असल्याने ते तुम्हाला श्रीमंत समजतील तेथे फक्त गरिबांना साखर व तांदूळ दिले जाते, असे सांगितले.

तसेच तुमच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची कर्णफुले, कानातील बुगड्या काढून माझ्याकडे द्या, असे सांगून ते सर्व दागिने काढून घेतले. त्यानंतर तांदूळ व साखर आणून देतो, असे सांगून लोंढे यांना गंगावेश चौकात थांबविले व तेथून त्या ठकसेन महिलेने दागिन्यांसह पलायन केले. याबाबत फसवणूक झाल्याची तक्रार संजीवनी लोंढे यांनी शाहुपूरी पोलीस ठाण्यात दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस