शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

मालवाहतुकीसाठी लालपरीचा हातभार ठरतोय मोलाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 17:17 IST

विशेष म्हणजे मालवाहतुकीचा दरही इतर खासगी मालवाहतूकदारांच्या तुलनेत कमी करण्यात आला आहे. तर लांजा येथून आठ टन तांदूळही कोल्हापुरातील गडहिंग्लजसाठी आरक्षित झाला आहे

ठळक मुद्दे आठ टन खताची लांजा येथे पाठवणी पंधराशेजणांनी केली ये-जा

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू सोडून अन्य कोणत्याही प्रकारची मालवाहतूक अद्यापही सुरू नाही. छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे मालाअभावी व्यवसाय धोक्यात येऊ नयेत. याकरिता एस. टी. महामंडळाने मालवाहतुकीचा सर्वोत्तम पर्याय आणला आहे. त्याचा फायदा घेत रविवारी लांजा येथे आठ टन खताची पाठवणी करण्यात आली.

गेल्या सत्तर दिवसांहून अधिक काळ राज्यात विविध ठिकाणच्या कोरोनाच्या परिस्थितीनुसार लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. त्यात ग्रीन झोन आणि ऑरेंज झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यांना जिल्हाअंतर्गत प्रवासी वाहतुकीस, तर राज्याच्या विविध सीमांपर्यतच्या कोणत्याही जिल्ह्यात एस.टी.च्या लालपरीने मालवाहतुकीसही परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने रविवारी लांजा (रत्नागिरी) येथे ८ टन खताची पाठवणी केली. विशेष म्हणजे मालवाहतुकीचा दरही इतर खासगी मालवाहतूकदारांच्या तुलनेत कमी करण्यात आला आहे. तर लांजा येथून आठ टन तांदूळही कोल्हापुरातील गडहिंग्लजसाठी आरक्षित झाला आहे. विशेष म्हणजे ३४ रुपये इतका प्रती किलोमीटरचा खर्च महामंडळास मालवाहतूक करताना येत आहे. त्यावर जो दर मिळेल त्याप्रमाणे मालवाहतूक केली जात आहे. त्यातून व्यापारी, उद्योजक, शेतकऱ्यांना अन्य मालवाहतूकदारांच्या तुलनेत किमान २ ते ३ हजार रुपयांपर्यंतचा फायदा होत आहे. वाढता प्रतिसाद पाहून महामंडळानेही सर्व एस.टी. बसेस परिपूर्ण केल्या आहेत. मालवाहतुकीपूर्वी व नंतरही बसेस सॅनिटायझर केल्या जात आहेत. तर चालकही मास्कसह सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत आहेत.प्रवासी वाहतुकीसह वाढता प्रतिसाद आहे. गेल्या नऊ दिवसांत १५०० हून अधिक प्रवाशांनी जिल्ह्यांतर्गत प्रवास केला आहे. यात इचलकरंजी, गारगोटी, गडहिंग्लज, हुपरी, राधानगरी, जयसिंगपूर, मलकापूर, या ठिकाणी फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. तर चंदगड, शाहूवाडी, आजरा या ठिकाणी कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे वाहतूक अत्यल्प करण्यात आली आहे. 

  •  खासगी ट्रान्सपोर्टच्या तुलनेत एस.टी.च्या लालपरीने मालवाहतूक केल्यास नागरिकांना किमान दोन हजार रुपयांचा फायदा मिळणार आहे.
  • मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील कोणत्याही जिल्ह्यांत कोल्हापुरातून लालपरीने मालवाहतूक करता येत आहे.
  • जिल्ह्यांतर्गत ५० कि.मी. पर्यंत मालाच्या प्रकारानुसार मालवाहतूक प्रति कि.मी.चे दर फ्लेक्झी करण्यात आले आहेत.

 

अत्यंत माफक दरात व महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यांत महामंडळाच्या बसेसमधून मालवाहतुकीची २४ बाय ७ अशा पद्धतीने सेवा दिली जात आहे. सोबत जिल्हांतर्गत प्रवासीवाहतूकही सुरू करण्यात आली आहे. त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा.- रोहन पलंगे, विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, कोल्हापूर 

टॅग्स :state transportएसटीcorona virusकोरोना वायरस बातम्याkonkanकोकण