लाडू टेंडर प्रक्रिया पारदर्शकच

By Admin | Updated: August 13, 2014 00:36 IST2014-08-13T00:23:10+5:302014-08-13T00:36:34+5:30

देवस्थानचे मत : समिती अधिकाऱ्यांचा संबंध नाही

The laddo tender process is transparent | लाडू टेंडर प्रक्रिया पारदर्शकच

लाडू टेंडर प्रक्रिया पारदर्शकच

कोल्हापूर : करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या लाडू प्रसादाचे टेंडर जिल्हाधिकारी कार्यालयात माझ्यासमक्ष व सर्व टेंडरधारकांसमोर सील असल्याची खात्री करून उघडण्यात आले. या प्रक्रियेत समितीच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांचा संबंध नाही. फक्त आपला हेतू साध्य झाला नाही म्हणून देवस्थान समितीस बदनाम करण्यासाठी लाडू टेंडरची खोटी माहिती देण्यात आली असल्याचा खुलासा देवस्थान समितीचे सदस्य हिरोजी परब यांनी केला आहे.
लाडू प्रसाद ठेका देवस्थान समितीचे प्रभारी अध्यक्ष राजाराम माने व सचिव संजय पवार यांनी बेकायदेशीररीत्या मंजूर केल्याचे प्रसिद्ध झाले आहे. मात्र, हे टेंडर फोडले गेले त्यावेळी मी स्वत: व टेंडरधारक उपस्थित होते. सर्वांच्या कागदपत्रांची पूर्तता झाल्याची खात्री करूनच दराचे लखोटे उघडण्यात आले व सर्वांत कमी दर असलेल्या ठेकेदारास तीन महिन्यांच्या मुदतीसाठी लाडूची प्रत, अन्नभेसळ परवाना अशा कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या अटीवर टेंडर मंजूर करण्यात आले. या प्रक्रियेत समितीच्या कोणत्याही कर्मचाऱ्याचा संबंध नाही. दोन वर्षांपूर्वीदेखील देवस्थान समितीस लाडू प्रसादावरून बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी गौरी बचत गटाला लाडू बनविण्यासाठीचेबेसन २७ रुपये किलो या दराने ठेका देण्यात आला होता व उच्च प्रतिचे साहित्य देवस्थान समितीकडून पुरविण्यात येत होते. गेली दोन वर्षे कोणतीही तक्रार नव्हती. मात्र, मंदिर परिसरात भट्टी लावणे, गॅस सिलिंडर लावणे योग्य नसल्याने यंदा संपूर्ण साहित्यांसह लाडू प्रसादाचा ठेका महिला बचत गटास दिलेला असून, ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शीपणाने करण्यात आली आहे, असे या निवेदनात परब यानी म्हटले आहे.

‘अन्न औषध’ किती सजग?
दोन वर्षांपूर्वी लाडूला बुरशी आल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने लाडूची तपासणी करून भेसळ नसल्याचा अहवाल दिला. आता एका संघटनेने तक्रार केल्यावर अधिकाऱ्यांनी लाडूच्या तपासणीसाठी धाड टाकली. वास्तविक दर महिन्याला किंवा ठरावीक कालावधीनंतर प्रशासनाने ही तपासणी करणे क्रमप्राप्त असते.

ज्या व्यवसायाचे उत्पन्न वर्षाला १२ लाखांवर असते. ठेकेदाराने किंवा व्यावसायिकाने अन्न व औषध प्रशासनाकडे त्याची रितसर नोंदणी करून व्यवसाय परवाना गरजेचे असते. मात्र, ठेकेदार बचतगटाकडे हा परवाना नसल्याचे अन्न व औषध विभागाला आढळले. लाडूच्या पाकिटावर त्यासाठी वापरलेले पदार्थ, लाडू बनवलेला दिवस व तो संपविण्याचा कालावधी लिहिलेला नाही. याचा अहवाल देवस्थान समितीला देण्यात येणार आहे.

Web Title: The laddo tender process is transparent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.