शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
4
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
5
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
6
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
7
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
8
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
9
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
10
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
11
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
12
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
13
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
14
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
15
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
16
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
17
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
18
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
19
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
20
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉलिबॉलसाठी कुरुंदवाड सज्ज

By admin | Updated: December 9, 2014 00:54 IST

उद्यापासून प्रारंभ : राज्यातून ७६ संघ दाखल; तयारी अंतिम टप्प्यात

कुरुंदवाड : येथे होणाऱ्या ४६व्या महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा व्हॉलिबॉल अजिंक्य स्पर्धेसाठी कुरुंवाडनगरी सज्ज झाली आहे. या स्पर्धा बुधवार (दि. १०) पासून सुरू होत असून, सोमवार (दि. १५) पर्यंत रंगणार आहेत. स्पर्धेकरिता तबक उद्यानातील क्रीडांगण विविध सोयी-सुविधांनी तयार करण्यात आल्याची माहिती श्री स्पोर्टस्चे अध्यक्ष जयराम पाटील, नगराध्यक्ष संजय खोत, प्राचार्य सुनील चव्हाण, प्राचार्य बी. डी. सावगावे यांनी पत्रकार बैठकीत दिली. श्री स्पोर्टस् क्लब यांच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेकरिता राज्यातून पुरुष व महिला गटातील ७६ संघ सहभागी होणार आहेत. त्या अनुषंगाने एक हजार खेळाडू व २०० पंच, प्रशिक्षक, निवड पदाधिकारी अशा दररोज १२०० जणांच्या जेवणाची सोय जैन सांस्कृतिक भवनमध्ये केली आहे, तर खेळाडूंच्या निवासाची सोय नृसिंहवाडी व कुरुंदवाड शहरातील ११८ खोल्यांमध्ये केली आहे. निवासस्थानापासून मैदानापर्यंत खेळाडूंना आणण्यासाठी खास वाहनांची व्यवस्था असून, आपत्कालीन व्यवस्थेसाठी लायन्स क्लब व मिरज येथील गुलाबराव पाटील ट्रस्टच्या रुग्णवाहिका तयार ठेवल्या आहेत. स्पर्धेकरिता कुरुंदवाड नगरपालिकेच्या तबक उद्यानमध्ये चार सुसज्ज मैदाने तयार केली आहेत. सकाळ, दुपार, सायंकाळ अशा तीन सत्रांत या स्पर्धा होणार आहेत. यासाठी २८ फूट उंचीची विद्युतझोत व्यवस्था करण्यात आली आहे. लोकांना स्पर्धा व्यवस्थित पाहता यावी याकरिता तयार असलेल्या गॅलऱ्यांची रंगरंगोटी करून बसण्याची व्यवस्था केली आहे. या स्पर्धेचे मुख्य प्रयोजक बॅँक आॅफ महाराष्ट्र आहे. स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी सायंकाळी सहा वाजता श्री गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांच्या हस्ते व जिल्हा बॅँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. (वार्ताहर)