कुरुंदवाड जि. प. दवाखान्यातून कालबाह्य औषध देण्याचा प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:39 IST2020-12-15T04:39:43+5:302020-12-15T04:39:43+5:30
कुरुंदवाड : येथील जिल्हा परिषदेच्या दवाखान्यामध्ये रुग्णांना कालबाह्य झालेल्या गोळ्या देण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे तालुका ...

कुरुंदवाड जि. प. दवाखान्यातून कालबाह्य औषध देण्याचा प्रकार
कुरुंदवाड : येथील जिल्हा परिषदेच्या दवाखान्यामध्ये रुग्णांना कालबाह्य झालेल्या गोळ्या देण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे तालुका आरोग्य अधिकारी पी. एस. दातार यांनी जिल्हा परिषद दवाखान्याची भेट देऊन औषध साठ्याची तपासणी केली. या तपासणीमध्ये कालबाह्य औषधे मिळून आलेली नाहीत. मात्र, घडल्या प्रकाराबाबत औषध देणाºया औषध निर्माण अधिकाºयाला नोटीस बजावणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद दातार यांनी दिली.
शहरात जिल्हा परिषदेचा दवाखाना कार्यरत आहे. रुग्णावर याठिकाणी प्राथमिक उपचार केले जातात. मात्र, या दवाखान्यामध्ये रुग्णांना कालबाह्य औषधांच्या गोळ्या देण्याचा प्रकार उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांतून तीव्र संताप व्यक्त होत होता.
सोमवारी दुपारी तालुका आरोग्य अधिकारी दातार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्य केंद्रातील शिल्लक औषध साठ्यांची तपासणी केली. यामध्ये कालबाह्य औषधे सापडली नसली तरी रुग्णांना कालबाह्य औषधे देऊन कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल दवाखान्यातील औषध निर्माण अधिकाऱ्याला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावणार असल्याचे अधिकारी दातार यांनी सांगितले. यावेळी वैद्यकीय अधिकारी रेखा तराळ यांच्यासह वैद्यकीय पथक उपस्थित होते.