शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

अपहरणामध्ये नाव असतानाही कुरूंदकरला ‘राष्ट्रपती’ पदक-:अश्विनी बिंद्रे खून प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 1:16 AM

कोल्हापूर : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अभय कुरुंदकर यांचा बिंद्रे यांच्या अपहरणात सहभाग असल्याची तक्रार होऊनही व त्यासंबंधीची याचिका उच्च न्यायालयातदाखल असतानाही कुरुंदकरयांना पोलीस खात्यातील गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल गतवर्षी राष्ट्रपती पोलीस पदकाचा बहुमान मिळाला आहे.त्यामुळे हे पदक देताना कोणते निकष लावले जातात व कुरुंदकर यांना ...

ठळक मुद्दे पोलीस खात्याचा कारभारबिंद्रे यांनी जगून दाखवून त्याला हिसका दाखवायला हवा होता. स्वत: इतक्या सक्षम असतानाही त्या कशा बळी पडल्या, अशीही शंका काहींनी बोलून दाखविली.

कोल्हापूर : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अभय कुरुंदकर यांचा बिंद्रे यांच्या अपहरणात सहभाग असल्याची तक्रार होऊनही व त्यासंबंधीची याचिका उच्च न्यायालयातदाखल असतानाही कुरुंदकरयांना पोलीस खात्यातील गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल गतवर्षी राष्ट्रपती पोलीस पदकाचा बहुमान मिळाला आहे.त्यामुळे हे पदक देताना कोणते निकष लावले जातात व कुरुंदकर यांना कुणाच्या मेहरबानीने हेपदक मिळाले, याचीही चौकशी होण्याची गरज आहे.

तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) राजकुमार व्हटकर यांनी त्यासंबंधीचा आदेश ३० जानेवारी २०१७ ला काढला आहे. भारताच्या राष्ट्रपतींनी २६ जानेवारी २०१७ च्या प्रजासत्ताकदिनी गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर केलेल्या यादीत कुरुंदकर यांचे नाव १३ व्या क्रमांकावर आहे. त्यावेळी ते ठाणे ग्रामीणला स्थानिक गुन्हे शाखा विभागात पोलीस निरीक्षक म्हणून सेवेत होते. कुरुंदकर यांच्यासह ३६ अधिकाºयांना हे पदक दिले आहे. बिंद्रे यांच्या अपहरणप्रकरणी कुरुंदकर यांच्याविरुद्ध कळंबोली पोलीस ठाण्यात ३१ जानेवारी २०१७ ला रीतसर गुन्हा दाखल झाला आहे; परंतु तत्पूर्वी १४ जुलै २०१६ ला अपहरणाची मूळ तक्रार दाखल झाली आहे. १५ जुलै २०१६ ला ठाणे पोलीस उपायुक्तांनी कुरुंदकर यांचे नाव बिंद्रे यांच्या अपहरण प्रकरणात संशयित म्हणून पुढे येत असल्याने त्यांची स्थानिक गुन्हे शाखेतून अन्यत्र साईड पोस्टिंगला बदली करावी, असा अहवाल दिला आहे. अपहरणाचा गुन्हा दाखल होऊनही पोलीस तपासात लक्ष देत नाहीत म्हणून बिंद्रे कुटुंबीयांनी ४ आॅक्टोबर २०१६ ला उच्च न्यायालयात आर्टिकल २२६ अन्वये कुरुंदकर यांच्या नावाचा थेट उल्लेख करून याचिका दाखल केली. त्याच्याही पुढे जाऊन न्यायालयाने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक दर्जाचा अधिकारी नेमावा, असे आदेश दिले असतानाही या प्रकरणाचा तपास पुढे सरकला नाही; परंतु कुरुंदकर यांना मात्र बक्षिसी म्हणून चक्क राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले. त्यांनी या काळात कोणते गुणवत्तापूर्ण काम केले, याचा शोध पोलीस खात्याने घेतलेला नाही. कुरुंदकर यांच्यावर सत्तारूढ पक्षातील खानदेशातील बड्या नेत्याचा वरदहस्त होता. त्या जोरावर माझे कोण वाकडे करू शकत नाही, असा त्याचा रुबाब होता. पोलीस खात्यातही तो अत्यंत मग्रुरीने वागत असे, अशी माहिती आता पुढे येत आहे.हिंसेचे टोकअश्विनी बिंद्रे यादेखील पोलीस अधिकारी होत्या. संघर्ष करून त्यांनी आयुष्य घडविले होते. कुरुंदकर यांनी त्यांच्याशी संबंध ठेवले व नाते निभावण्यासाठी तगादा सुरू झाल्यावर अत्यंत क्रूरपणे कुरुंदकर यांनी त्यांचा काटा काढला. एखादा वरिष्ठ पोलीस अधिकारीही किती हिंसक वागू शकतो याबद्दल शनिवारी दिवसभर समाजमाध्यमांत चर्चा झाली. बिंद्रे यांनी जगून दाखवून त्याला हिसका दाखवायला हवा होता. स्वत: इतक्या सक्षम असतानाही त्या कशा बळी पडल्या, अशीही शंका काहींनी बोलून दाखविली.पोलीस दलाचे धिंडवडेसांगलीतील कोठडीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळे याचा मृतदेह सहायक पोलीस निरीक्षक युवराज कामटेसह इतरांनी नेऊन आंबोलीत जाळला. त्या प्रकरणाने पोलीस खात्यातील क्रौर्याची सीमा गाठली गेली. हे प्रकरण आता कुठे मागे पडले होते तोपर्यंत बिंद्रे प्रकरणाने पोलीस खात्याची प्रतिमा धुळीला मिळविली. आपल्या सहकारी असलेल्या एका महिला अधिकाºयाचे जीवनच उद्ध्वस्त करण्यापर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकाºयांची मजल जाते, याबद्दल समाजातून चीड व्यक्त झाली.जिल्ह्यातील लाकूड वखारवाले रडारवरकोल्हापूर : महिला पोलीस अधिकारी अश्विनी राजू गोरे-बिंद्रे यांचा खून करून मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी वापरलेल्या इलेक्ट्रिक कटरची कोल्हापुरात विल्हेवाट लावल्याचे तपासात पुढे आले आहे. त्यामुळे मुंबईतील विशेष पथक गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापुरात तळ ठोकून आहे. या पथकाने जिल्ह्यातील सर्व लाकूड वखारदारांना निशाण्यावर घेतले आहे.