शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

कुंभी कारखाना निवडणूक: जसं ठरलंय तसंच झालंय; आमदार सतेज पाटलांच्या पाठबळाची जोरदार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 12:34 IST

सांगरूळ, कोगे, पाडळी खुर्दने दिली नरकेंना साथ

कोल्हापूर : आमदार सतेज पाटील यांनी नरके पॅनलला पाठिंबा दिल्यानंतर कार्यक्षेत्रात ‘आमचं ठरलयं...’ ही टॅगलाइन फिरत होती. निकालामध्येही त्याचे पडसाद दिसत होते. गट क्रमांक १, ३ व गगनबावडा तालुक्यात सतेज पाटील यांचा प्रभाव आहे. येथे विरोधी शाहू आघाडीचे मताधिक्य कमी करत नरके पॅनलला निर्णायक आघाडी मिळवण्यात यश आले. त्यामुळे निकालानंतर ‘जसं ठरलंय तसंच झालंय’, ही टॅगलाइन सोशल मीडियावर जोरदार फिरत होती.विरोधकांनी सुरुवातीपासूनच चंद्रदीप नरके यांना एकाकी पाडण्याचे नियोजन केले होते. त्यात अरुण नरके यांनीही चंद्रदीप यांचा हात सोडल्याने त्यांच्या अडचणी वाढणार की काय, असे वाटत होते. मात्र सतेज पाटील यांनी उघड भूमिका घेत त्यांना पाठिंबा दिल्याने त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याची चर्चा सुरू आहे.सांगरूळ, कोगे, पाडळी खुर्दने दिली नरकेंना साथमतदान अधिक व विरोधी पॅनलचे नेतृत्व सांगरूळमधील होते, तरीही पॅनल टु पॅनल मतदानामध्ये नरके पॅनल सरस ठरले. त्याचबरोबर कोगे, पाडळी खुर्द, वाकरे, कसबा बीड, सडोली दुमाला या गावांनी चंद्रदीप नरकेंना साथ दिल्याने पहिल्या फेरीतील मताधिक्य कमी करत विरोधकांवर निर्णायक आघाडी घेतली.घसरलेल्या मताधिक्याने चिंता वाढवलीपहिल्या फेरीत अपेक्षित मताधिक्य न मिळाल्याने विरोधकांच्या चेहऱ्यावर चिंता वाढली होती. तर चंद्रदीप नरके समर्थकांना निवडणूक एकतर्फी मारू शकतो याचा अंंदाज आला होता. दुसऱ्या फेरीनंतर विरोधकांना निकालाचा अंदाज आला होता.बालेकिल्ल्यात मोठ्या मताधिक्यापासून विरोधकांना रोखलेसांगरूळ व कुडित्रे गटात विरोधकांनी ताकद पणास लावली होती. कोपार्डे व तीन-चार गावे वगळता इतर गावांनी नरके पॅनलला चांगली साथ दिल्याने विरोधकांच्या बालेकिल्ल्यात मोठ्या मताधिक्यापासून रोखण्यात नरकेंना यश मिळाले. या परिसरातून किमान दीड ते दोन हजारांचे मताधिक्य राहील, असा विश्वास विरोधकांना हाेता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूकSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील