शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कुंभी कारखाना निवडणूक: 'खोट बोल पण रेटून बोल' हाच विरोधकांचा उद्योग - चंद्रदीप नरके 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 18:00 IST

आमदार पी. एन. पाटलांनी सावध होण्याची गरज

शिवाजी लोंढे 

कसबा बीड : कुंभीवर बोलण्यासारखे काहींच नसल्याने विरोधक बिथरले आहेत. त्यामुळे वैयक्तिक पातळीवर टिका करत 'खोट बोल पण रेटून बोल' हा एकमेव उद्योग विरोधक करत असल्याची टीका कुंभी'चे अध्यक्ष, माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केली. कोगे ता. करवीर येथे नरके पॅनेलच्या सभेत ते बोलत होते, अध्यक्षस्थानी पी. बी. पाटील होते. यावेळी बोलताना नरके म्हणाले, कोरोना संकटकाळ,केंद्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे साखरेचे दर घसरल्याने साखरधंदा अडचणीत आला असतानाही राज्यात पहिल्या तीन क्रमांकात कुंभीने दर दिला. सहवीज प्रकल्प, डिस्टलरी कप्यासिटी वाढविली. कारखान्याचे क्रसिंग वाढविले, इथेनॉल प्रकल्पही होत आहे, तोडणी कामगार, वाहतुकीची आणि शेतकऱ्यांची बिले वेळेवर दिली. चालू हंगामामध्ये सात लाख गाळप होऊन सहवीज, डिस्टलरीत फायदाच झाला. कर्जाचे व्याज किंवा हप्ता कधीच थकला नाही. विरोधक कर्जाबाबत चूकीची माहिती पसरवत आहेत, सन २०१७/१८ ला एफआरपी प्रमाणे सर्वच कारखान्यांनी दर घोषित केला. पण फक्त कुंभीनेच १०० चे बील दिले, सभासद शेअर्स व टनेज साखर दिली, पण 'कारंजा का उडत नाही'हेच विरोधकांना दिसते.पी. एन. पाटलांनी सावध होण्याची गरजकुंभी परिसरातील जेष्ठ नेत्यांना घरी बसवून एक पॅनेलचे नेते झाले तर दुसरे कुंभी बचाव मंचचे नेते, यांच्यापासून आमदार पी. एन. पाटील यांनीही सावध होण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.कुंभीत पुन्हा नरकेच..! ‌रामकृष्ण पाटील (वरंगेकर) म्हणाले, नरकेंनी कुंभीत कुस्तीला प्राधान्य दिले, परिसरातील मल्ल महाराष्ट्र केसरी पर्यंत पोहोचले, शैक्षणिक प्रगती घडवून कारखाना चांगला चालविला म्हणूनच आमचे नेते बंटी पाटील यांनी यावेळी नरके पॅनेलला पाठबळ दिले आहे. 'आमचं ठरलंय' याप्रमाणे आता 'पक्कं ठरलंय' कुभींत पुन्हा नरकेच..! असे ते म्हणाले.       यावेळी  प्रकाश पाटील, बी. बी. पाटील, पुंडलिक पाटील यांची मनोगते झाली. याप्रसंगी भगवान पाटील, रंगराव पाटील, रविंद्र मडके, अनिल पाटील, उत्तम वरूटे, दादासाहेब लाड, सर्जेराव हुजरे, यांच्यासह सभासद ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या. आभार वैभव गुरव यांनी मानले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूक