के.एस.ए. वरिष्ठ लीग फुटबाॅल संघ नोंदणीस सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:46 IST2021-02-18T04:46:07+5:302021-02-18T04:46:07+5:30

कोल्हापूर : फुटबाॅल चाहत्यांसह खेळाडूंमध्ये उत्सुकता लागून राहिलेल्या के.एस.ए. वरिष्ठ लीग फुटबाॅल संघ नोंदणीस बुधवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी ...

K.S.A. Senior league football team registration begins | के.एस.ए. वरिष्ठ लीग फुटबाॅल संघ नोंदणीस सुरुवात

के.एस.ए. वरिष्ठ लीग फुटबाॅल संघ नोंदणीस सुरुवात

कोल्हापूर : फुटबाॅल चाहत्यांसह खेळाडूंमध्ये उत्सुकता लागून राहिलेल्या के.एस.ए. वरिष्ठ लीग फुटबाॅल संघ नोंदणीस बुधवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी चार संघांनी नोंदणी केली.

कोरोनाच्या महामारीमुळे मागील वर्षीचा फुटबाॅल हंगाम अर्ध्यात संपला. त्यामुळे यंदाचा फुटबाॅल हंगामाची सुरुवात होते की, नाही याबाबची साशंकता असलेल्या फुटबाॅलपटूंसह चाहत्यांना यंदाचा हंगाम सुरू होणार असल्याचे सूतोवाच के.एस.ए.ने अधिकृतरीत्या केले आहे. त्यानुसार बुधवारपासून फुटबाॅल संघांच्या नोंदणीस सुरुवात झाली आहे. यात पहिल्या दिवशी प्रॅक्टिस फुटबाॅल क्लब, दिलबहार तालीम मंडळ (अ), ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ, कोल्हापूर पोलीस संघ या संघांनी नोंदणी केली आहे. आज, गुरुवारी उर्वरित बारा संघ नोंदणी करणार आहेत. नोंदणीसाठी विलंबामध्ये शनिवार (दि.२०) ची अंतिम तारीख आहे, अशी माहिती के.एस.ए.तर्फे देण्यात आली.

Web Title: K.S.A. Senior league football team registration begins