के.एस.ए. वरिष्ठ लीग फुटबॉल- पाटाकडील ‘ब’-मंगळवार पेठ यांच्यातील लढत बरोबरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 12:12 IST2020-01-13T12:11:20+5:302020-01-13T12:12:59+5:30

के.एस.ए. वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धेत पाटाकडील तालीम मंडळ ‘ब’ व मंगळवार पेठ फुुटबॉल क्लब यांच्यातील लढत ३-३ अशी बरोबरीत राहिली. सामन्यात ‘पाटाकडील’च्या वैभव देसाईने तीन, तर मंगळवार पेठच्या नितीन पोवारने दोन गोल केले.

K.S.A. Senior League Football - The 'B' on Tuesday | के.एस.ए. वरिष्ठ लीग फुटबॉल- पाटाकडील ‘ब’-मंगळवार पेठ यांच्यातील लढत बरोबरीत

कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या के. एस. ए. वरिष्ठ फुटबॉल लीग स्पर्धेत पाटाकडील तालीम मंडळ ‘ब’ व मंगळवार पेठ फुटबॉल संघ यांच्यात झालेल्या सामन्यातील एक क्षण. (छाया : नसीर अत्तार)

ठळक मुद्देके.एस.ए. वरिष्ठ लीग फुटबॉलपाटाकडील ‘ब’-मंगळवार पेठ यांच्यातील लढत बरोबरीत

कोल्हापूर : के.एस.ए. वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धेत पाटाकडील तालीम मंडळ ‘ब’ व मंगळवार पेठ फुुटबॉल क्लब यांच्यातील लढत ३-३ अशी बरोबरीत राहिली. सामन्यात ‘पाटाकडील’च्या वैभव देसाईने तीन, तर मंगळवार पेठच्या नितीन पोवारने दोन गोल केले.

छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत रविवारी या दोन संघांत सामना झाला. सामन्याच्या प्रारंभापासून पाटाकडील ‘ब’च्या खेळाडूंनी सामन्यावर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. संघाच्या वैभव देसाई, प्रथमेश पाटील, रोहित पवार, यश देवणे, ऋषिकेश मोरे, आदींनी वेगवान चढाया करीत मंगळवार पेठ संघाची बचावफळी भेदण्याचा प्रयत्न केला. सामन्याच्या १६ व्या मिनिटाला वैभव देसाईने गोल नोंदवत संघाला १-० अशी बढत दिली.

‘मंगळवार’कडून बरोबरी साधण्याचा प्रयत्न सुरू असतानाच ३६ व्या मिनिटाला वैभव देसाईने संघाचा व वैयक्तिक दुसरा गोल नोंदविला. ‘मंगळवार’कडून सामन्याच्या ४० व्या मिनिटाला नितीन पोवारने गोल नोंदविला. त्यामुळे २-१ अशी सामन्याची स्थिती झाली.

उत्तरार्धात मंगळवार पेठ संघाकडून नितीन पोवार, आकाश माने, आदित्य लाड, ऋषिकेश पाटील, शिवम पोवार, सचिन राघव यांनी खोलवर चढाया केल्या. सामन्याच्या ४५ व्या मिनिटाला मंगळवार पेठ संघाच्या आकाश मायणे याने गोल नोंदवत सामना २-२ असा बरोबरीत आणला.

त्यानंतर नितीन पोवारने सामन्याच्या ५२ व्या मिनिटाला गोल नोंदवत ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या जादा वेळेत पाटाकडील ‘ब’च्या वैभव देसाई याने गोल नोंदवीत सामना ३-३ असा बरोबरीत आणल्यामुळे दोन्ही संघांना मिळाला.
 

 

 

Web Title: K.S.A. Senior League Football - The 'B' on Tuesday