शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

‘कृष्णा’च्या बाजारात आश्वासनांची खैरात

By admin | Updated: June 3, 2015 01:01 IST

फुकट साखर, उच्चांकी दर : ‘अशक्य ते सर्व’ देण्याचे आश्वासन

अशोक पाटील -इस्लामपूर -विद्यमान अध्यक्ष अविनाश मोहिते, माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते आणि डॉ. सुरेश भोसले यांनी निवडणुकीच्या निमित्ताने ‘कृष्णा’चा बाजार मांडला आहे. या बाजारात डॉ. सुरेश भोसले यांनी आम्हाला निवडून द्या, फुकट साखर देतो, असे सभासदांना आश्वासन देण्यास सुरुवात केली आहे. उच्चांकी दरासह अशक्य असणारी अनेक आश्वासने तिन्ही पॅनेलप्रमुखांकडून दिली जात आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने सभासदांवर आश्वासनांची खैरात सुरू आहे.रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी कारखान्याच्या निवडणुकीचे धूमशान गेल्या दोन महिन्यांपासून रंगले आहे. डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या रयत पॅनेलच्या माध्यमातून प्रचार शिगेला नेला आहे. विद्यमान अध्यक्ष अविनाश मोहिते हे कारखाना कसा तोट्यात आणला, याचा पाढा प्रचार दौऱ्यातून वाचत आहेत. कारखाना कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावात त्यांच्या किमान दोन ते तीन सभा झाल्या आहेत. असाच प्रकार सहकार पॅनेलप्रमुख व संस्थापक पॅनेलप्रमुखांचा आहे. जेथे मोहिते यांनी सभा घेतल्या आहेत, तेथे डॉ. भोसले व विद्यमान अध्यक्ष मोहिते यांनीही सभा घेतल्या आहेत. या सभामंधून तिन्ही पॅनेलप्रमुखांनी सभासदांवर आश्वासनांची खैरात केली आहे. सभासद हे ऐकून ऐकून वैतागले असून, पदरात पडेल त्यावेळीच खरे, असे म्हणत कोणाला मतदान करायचे, या संभ्रमात आहेत. रयत पॅनेलकडून माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते आणि मदन मोहिते सभासदांना वेगवेगळी आश्वासने देण्यात आघाडीवर आहेत, तर सहकार पॅनेलचे डॉ. सुरेश भोसले आणि डॉ. अतुल भोसले वेगवेगळ्या भूमिका सभासदांसमोर मांडत आहेत. या दोन पॅनेलमध्येच मोठी चुरस असल्याची चर्चा आहे. विद्यमान अध्यक्ष अविनाश मोहिते ‘एकला चलो रे’चा नारा देत दोघांना शह देण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकताच तिन्ही पॅनेलच्या प्रचाराचा प्रारंभ मोठ्या धुमधडाक्यात करण्यात आला. यावेळी तिन्ही गटाच्या प्रमुखांनी सभासदांवर आश्वासनांची खैरात केली. मोफत साखर, उच्चांकी दर, नोकरीत कायम करणे अशी आश्वासने दिली आहेत. ही आश्वासने निवडणूक झाली की सर्व नेते विसरून जातात. तसा अनुभव प्रत्येक निवडणुकीत सभासदांना आला आहे. त्यामुळे यावेळच्या आश्वासनानंतर नेमके किती पदरात पडणार, याची चर्चा सभासदांतून आहे.