साक्षीच्या निधनाने कोथळीकर हळहळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:19 IST2021-06-06T04:19:14+5:302021-06-06T04:19:14+5:30

कोथळी, ता. शिरोळ येथील साक्षी सुकुमार मिनचे यांचं वयाच्या १७ व्या वर्षी रक्ताच्या कर्करोगाने निधन झालं. पाच महिन्यांपूर्वी साक्षीला ...

Kothalikar was shocked by the death of the witness | साक्षीच्या निधनाने कोथळीकर हळहळले

साक्षीच्या निधनाने कोथळीकर हळहळले

कोथळी, ता. शिरोळ येथील साक्षी सुकुमार मिनचे यांचं वयाच्या १७ व्या वर्षी रक्ताच्या कर्करोगाने निधन झालं.

पाच महिन्यांपूर्वी साक्षीला कर्करोगाच निदान झालं होतं. तद्नंतर तिच्यावर उपचार सुरू होते. परंतु शुक्रवारी रात्री तिचे निधन झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

साक्षी जयसिंगपूर कॉलेजची विद्यार्थिनी असून तिने १० वी मध्ये ९१ टक्के गुण मिळविले होते. मृदू व नम्र स्वभाव ही तिची खासियत होती. परंतु पाच महिन्यांपूर्वी तिला कर्करोगाचे निदान झाले. कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी त्या आजारावर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. घरची परिस्थिती बेताची असल्याने येथील नागराज फाउंडेशनने मदतीसाठी मोठे प्रयत्न केले होते. परंतु शुक्रवारी निधन झाल्याने ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली.

तिच्या पश्चात आई, वडील, बहीण, आजी, आजोबा असा परिवार आहे.

Web Title: Kothalikar was shocked by the death of the witness