शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील विमानसेवा खंडित; प्रवाशांतून नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 18:38 IST

तब्बल सहा वर्षांनंतर सुरू झालेली कोल्हापूरची विमानसेवा अवघ्या दोनच महिन्यांमध्ये खंडित झाल्याने प्रवाशांसह कोल्हापूरकरांतून नाराजी व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देकोल्हापुरातील विमानसेवा खंडित; प्रवाशांतून नाराजीएअर डेक्कनने तांत्रिक कारणामुळे केल्या फ्लाईट रद्द

कोल्हापूर : तब्बल सहा वर्षांनंतर एप्रिलमध्ये सुरू झालेली कोल्हापूरची विमानसेवा पुन्हा खंडित झाली आहे. तांत्रिक कारणामुळे एअर डेक्कन कंपनीने कोल्हापूर-मुंबई विमानसेवा थांबविली आहे. विमानसेवा अवघ्या दोनच महिन्यांमध्ये खंडित झाल्याने प्रवाशांसह कोल्हापूरकरांतून नाराजी व्यक्त होत आहे.

इंडिगो आणि स्पाईसजेट कंपनीने कोल्हापुरातून सेवा देण्याची तयारी दाखविली आहे. यातील केंद्र सरकारच्या उडान योजनेतंर्गत कोल्हापूर-मुंबई विमानसेवा एअर डेक्कनच्यावतीने दि. १७ एप्रिलपासून सुरू झाली.

आठवड्यातील रविवार, मंंगळवार आणि बुधवारी विमानसेवा सुरू होती. त्याला कोल्हापुरातून चांगला प्रतिसाद मिळाला. जुलैच्या दुसऱ्या आठवड्याअखेरपर्यंत प्रवाशांनी नोंदणी केली आहे. मात्र, अचानकपणे एअर डेक्कनने तांत्रिक कारणामुळे या आठवड्यातील फ्लाईट रद्द केल्या. त्याची माहिती प्रवाशांना देण्यात आली.

दरम्यान, याबाबत एअर डेक्कनचे कोल्हापुरातील व्यवस्थापक नंदकुमार गुरव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कंपनीने तांत्रिक कारणामुळे कोल्हापूर-मुंबई विमानसेवा थांबविली असल्याचे सांगितले.

कायमस्वरूपी सेवा सांगूनही खंडितकोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरळीत, कायमस्वरूपी सुरू करावी, अशी अपेक्षा या कंपनीचे मालक कॅप्टन गोपीनाथ यांच्याकडे व्यक्त केली. त्यावेळी ही विमानसेवा कायमस्वरूपी सुरू केली जाईल, असे कॅप्टन गोपीनाथ यांनी सांगितले होते. मात्र, अवघ्या दोनच महिन्यांत त्यांच्याकडून कोल्हापूरची सेवा खंडित झाली.

सरकारची मदत, प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असताना देखील एअर डेक्कन कंपनीने तांत्रिक कारण पुढे करून कोल्हापूर-मुंबई विमानसेवा थांबविली आहे, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. ते म्हणाले, आठ-दहा दिवसांत सेवा पुन्हा सुरू केली नाही, तर या कंपनीला ‘ब्लॅक लिस्ट’ करण्याची मागणी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे करणार आहे.

 

टॅग्स :airplaneविमानkolhapurकोल्हापूर