Kolhapur airport shut down | कोल्हापूरची विमान सेवा बंद, कर्मचा-यांचे वेतन थकविल्याचा संशय
कोल्हापूरची विमान सेवा बंद, कर्मचा-यांचे वेतन थकविल्याचा संशय

ठळक मुद्देकोल्हापूरची विमान सेवा बंदकर्मचा-यांचे वेतन थकविल्याचा संशयकर्मचाऱ्यांचे वेतन कंपनीने थकविले?

कोल्हापूर :  केंद्र शासनाच्या 'उडान' योजनेंतर्गत तब्बल सहा वर्षानंतर कोल्हापूर विमानतळावरून सुरू झालेली विमानसेवा बंद झाली आहे. कोल्हापूर ते मुंबई अशी विमानसेवा एअर डेक्कन विमान कंपनीने सुरू केली होती. 

गेल्या काही महिन्यांपूर्वी उडान योजनेंतर्गत सुरु झालेली मुंबई-कोल्हापूर विमानसेवा एअर डेक्कन विमान कंपनीने बंद केली आहे. तांत्रिक अडचणीमुळे ही विमानसेवा बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, तीन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे वेतन कंपनीने थकविल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. 

कोल्हापूर विमानतळावरून नियमित विमानसेवा सुरू व्हावी, यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून सातत्यानं प्रयत्न आणि पाठपुरावा सुरू ठेवला होता. गेली साडेतीन वर्षं संबंधित खात्याच्या मंत्रीमहोदय आणि वरिष्ठ अधिकार्‍यांशी वारंवार बैठका घेऊन, तसेच थेट संसदेत प्रश्‍न उपस्थित करून, महाडिक यांनी हा विषय लावून धरला होता. त्यानंतर एअर डेक्कन कंपनीकडून कोल्हापूर ते मुंबई विमान सेवा सुरू करण्यात आली होती. 


Web Title: Kolhapur airport shut down
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.