शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

एका लाखाचे १.७२ लाख मिळवा; कोल्हापुरातील व्ही. पी. ट्रेडिंग कंपनीने घातला गंडा

By उद्धव गोडसे | Updated: November 30, 2023 12:50 IST

प्रमुखांकडून गुंतवणूकदारांना दमदाटी

उद्धव गोडसेकोल्हापूर : रंकाळा येथील व्ही. पी. ट्रेडिंग अँड कन्सलटन्सी कंपनीने दरमहा सहा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे. याबाबत प्रसाद शामराव घोरपडे (रा. फुलेवाडी, चौथा बसस्टॉप, कोल्हापूर) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. फसवणुकीची रक्कम २० कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता गुंतवणूकदारांकडून वर्तवली जात आहे.शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जादा परतावा देण्याचे आमिष दाखवणारी कार्यालये शहराच्या गल्ली-बोळात सुरू आहेत. दर आठवड्याला एका कंपनीकडून फसवणूक झाल्याचे उघडकीस येत असतानाही, गुंतवणूकदारांना जादा परतावा मिळवण्याचा मोह आवरत नाही. त्यामुळेच फसवणुकीचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. रंकाळा येथील व्ही. पी. ट्रेडिंग अँड कन्सलटन्सी कंपनीने गुंतवणूकदारांची फसवणूक केली.तक्रारदार प्रसाद घोरपडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका मित्राने त्यांना व्ही. पी. ट्रेडिंग कंपनीची माहिती दिली. दरमहा सहा टक्के परतावा आणि १२ महिन्यांनी मुद्दल परत देण्याच्या योजनेत त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानुसार घोरपडे यांनी जून २०२१ ते जुलै २०२२ या काळात टप्प्या-टप्प्याने कंपनीत नऊ लाख रुपये गुंतवले. नोव्हेंबर २०२२ पासून त्यांना परतावे मिळणे बंद झाले. त्यानंतर त्यांनी कंपनीचे प्रमुख वैभव पाटील आणि मॅनेजर रोहित वरेकर (दोघेही रा. अंबाई टँक, कोल्हापूर) यांच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र, दोघांनी घोरपडे यांना धमकावून पैसे देण्यास नकार दिला.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच घोरपडे यांनी २३ नोव्हेंबरला जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. अर्ज देऊन आठवडा उलटला तरी अजूनही पोलिसांनी त्यांनी फिर्याद नोंदवून घेतलेली नाही. तसेच कंपनीची चौकशीही केलेली नाही. पोलिसांनी फिर्याद न घेतल्यास पोलिस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज देणार असल्याची माहिती गुंतवणूकदार घोरपडे यांनी दिली.

अशी होती योजना..एक लाखाच्या पुढे गुंतवणूक केल्यास दरमहा सहा टक्क्याने परतावा दिला जाणार. तसेच १२ महिन्यांनंतर एक लाखाची मुद्दलही परत दिली जाणार. म्हणजे लाखाच्या गुंतवणुकीवर वर्षभरात एक लाख ७२ हजार रुपये देण्याचा लेखी करार कंपनीने केला होता.

व्यावसायिक, नोकरदारांनी केली गुंतवणूककंपनी सेबीकडे नोंदणीकृत असल्याचे सांगत कंपनीचे प्रमुख वैभव पाटील यांनी करारपत्र आणि गुंतवणुकीच्या रकमेची पावतीही गुंतवणूकदारांना दिली. कंपनीच्या आमिषांना भुलून व्यावसायिक, नोकरदार आणि काही ज्येष्ठ नागरिकांनीही व्ही. पी. ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्याची माहिती समोर येत आहे.

फोन बंद अन् दमदाटीगुंतवलेल्या पैशांची मागणी करताच कंपनीचा प्रमुख वैभव पाटील आणि मॅनेजर रोहित वरेकर यांनी मोबाइल नंबर बंद केले आहेत. त्यांच्याकडून दमदाटी केली जात आहे, अशी तक्रार गुंतवणूकदारांनी केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस