शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

कोल्हापूरची ‘तितिक्षा’ एक्स्प्रेस--‘खेलो इंडिया’त चमकली -चमकते तारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 19:00 IST

भारताची आॅलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व केलेली स्प्रिंट क्वीन पी. टी. उषा हिच्यानंतर महाराष्ट्राच्या माणदेशी एक्स्प्रेस अर्थात ललिता बाबर हिने आॅलिम्पिकमध्ये सहभाग नोंदविला. नुसता नोंदविला नाही तर त्यात सर्वोत्तम कामगिरीही केली.

ठळक मुद्देअल्पावधीत जिल्हा ते राष्ट्रीय स्तरावर अनेक पदकांची कमाई - आजपर्यंत मिळालेली पदके -- सुवर्ण १, रौप्य ६ कास्ट १४ तर खेलो इंडिया अंतर्गत राष्ट्रीय स्पर्धेत कास्य पदकाचा ललिता ने मान मिळविला आहे.

सचिन भोसले ।कोल्हापूर : भारताची आॅलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व केलेली स्प्रिंट क्वीन पी. टी. उषा हिच्यानंतर महाराष्ट्राच्या माणदेशी एक्स्प्रेस अर्थात ललिता बाबर हिने आॅलिम्पिकमध्ये सहभाग नोंदविला. नुसता नोंदविला नाही तर त्यात सर्वोत्तम कामगिरीही केली. तिच्या पावलावर पाऊल ठेवत आता कोल्हापूरची तितिक्षा पाटोळे हीही ‘कोल्हापूर एक्स्प्रेस’ म्हणून आपली नवी ओळख निर्माण करीत आहे. तिने अल्पावधीतच ‘खेलो इंडिया’अंतर्गत ४०० मीटर धावणेमध्ये सांघिक प्रकारात राज्याला कांस्यपदक मिळवून देत केरळनंतर महाराष्ट्राच्या मुलीही मैदानी स्पर्धेत आहेत, याची देशाला जाणीव करून दिली.

तीन वर्षांपूर्वी ‘सेव्हंथ डे’ या तिच्या स्कूलतर्फे जिल्हास्तरीय ४०० मीटर धावणे स्पर्धेत तिने वैयक्तिक द्वितीय क्रमांक पटकाविला. हे तिचे यश तिला ‘धावणे’सारख्या मैदानी स्पर्धेकडे खेचून गेले. त्यानंतर घरात आई दिव्या व वडील युवराज यांना तितिक्षाचा मैदानी स्पर्धेकडील कल जाणवला. आवड बघून वडील युवराज यांनी बाळराजे स्पोर्टस्चे अ‍ॅथलेटिक प्रशिक्षक जालंदर मेढे यांच्याकडे दाखल केले. तेथील मुलामुलींच्या सरावात तिची तयारी चांगली झाली. त्यात आठवीमध्ये तिने पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय मैदानी कनिष्ठ गटात ६०० मीटरमध्ये पहिलेवहिले राज्य पातळीवरील कांस्यपदक पटकाविले. नववीमध्ये असताना जिल्हा अ‍ॅथलेटिक्सच्या खुल्या गटात तिने ४०० मीटर धावण्यामध्ये ५९ सेकंदांची आश्चर्यकारक वेळ नोंदविली. त्यानंतर शिवाजी विद्यापीठ मैदानावर दररोजचे सरावाचे वेळापत्रक ठरले. त्यानुसार दुपारी चार ते सात वाजेपर्यंत सराव सुरू झाला. नुकत्याच पुणे येथील बालेवाडी क्रीडाग्राममध्ये झालेल्या ‘खेलो इंडिया’अंतर्गत राष्ट्रीय स्पर्धेत १७ वर्षांखालील गटात राज्याचे प्रतिनिधित्व करीत ४०० बाय ४०० मीटर स्पर्धेत तिने केरळच्या दोन मुलींना मागे टाकीत कांस्यपदक मिळवून दिले. त्यामुळे येत्या काळात युवा आशियाई, आशियाई, राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये कोल्हापूरची ही ‘तितिक्षा एक्स्प्रेस’ नक्कीच देशाचे नाव करील.इथे गती मिळालीशाळेत शारीरिक शिक्षक रूपेश सनदे यांनी सातवीत असताना जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी कोण उत्सुक आहेत का? असा सवाल वर्गात केला. क्षणाचाही विलंब न करता ‘तितिक्षा’ने हात वर केला. त्यानंतर रुईकर कॉलनीच्या मैदानावर सरावास सुरुवातही केली. महिनाभराची तयारी झाल्यानंतर तिने या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला. त्यानंतर पुढे अनेक जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि आता ‘खेलो इंडिया’ या राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. शाळेतील शिक्षकांकडूनची विचारणा हा तिच्या आयुष्यातील मैदानी स्पर्धेला गती देणारा क्षण ठरला. पुढे आई दिव्या व वडील युवराज यांनी तिच्यासाठी सायंकाळचा वेळ काढून सरावाला प्राधान्य दिले. 

मला पुन्हा एकदा देशाची दुसरी पी. टी.उषा, ललिता बाबर व्हायला आवडेल. या खेळात मायक्रो सेकंदचे महत्त्व अधिक आहे. त्यामुळे सराव हाच माझ्यासाठी एक बूस्टर आहे.- तितिक्षा पाटोळे, राष्ट्रीय धावपटू, कोल्हापूर

तितिक्षाची खेळातील आवड, सराव आणि प्रशिक्षक जालंदर मेढे यांचे मार्गदर्शन यांमुळे ती नक्कीच देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करेल.- युवराज पाटोळे,तितिक्षाचे वडील

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर