राज्यस्तरीय पीक स्पर्धेत कोल्हापूरच्या सहाजणांची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:06 IST2021-02-20T05:06:47+5:302021-02-20T05:06:47+5:30
कोल्हापूर : खरीप हंगाम राज्यपातळीवरील भात आणि सोयाबीन (२०२०-२१) पीक स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील सहा शेतकऱ्यांनी ...

राज्यस्तरीय पीक स्पर्धेत कोल्हापूरच्या सहाजणांची बाजी
कोल्हापूर : खरीप हंगाम राज्यपातळीवरील भात आणि सोयाबीन (२०२०-२१) पीक स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील सहा शेतकऱ्यांनी बाजी मारली. शेती उत्पादनात कोल्हापूर जिल्हा विविध पिकांमध्ये चांगले उत्पादन घेण्यात यशस्वी होत आहे.
भातपीक स्पर्धेत मलगोंडा सातगोंडा टेळे, रा. सुळकूड (ता. कागल) यांनी ११५ क्विंटल ५६ किलो इतके विक्रमी भात उत्पादन घेऊन राज्यात पहिला क्रमांक पटकावला. कृष्णात धोंडिराम पाटील, रा. भाटणवाडी (ता. करवीर) यांनी ११४ क्विंटल ८१ किलो भात उत्पादन घेऊन दुसरा, तर कृष्णात महादेव जरग, रा. म्हसवे (ता. भुदरगड) यांनी ९० क्विंटल १८ किलो भात उत्पादन घेऊन तृतीय क्रमांक पटकावला.
सोयाबीन स्पर्धेत मधुकर आण्णाप्पा तेलवेकर, रा. पिंपळगाव खुर्द (ता. कागल) यांनी ३१ क्वि. ४४ किलो उत्पादन घेऊन राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. काशिनाथ जगन्नाथ मुजुमदार, रा. कागल यांनी २९ क्विंटल ८७ किलो उत्पादन घेऊन दुसरा, तर कृष्णा दादू पाटील, रा. कडगाव (ता. गडहिंग्लज) यांनी २६ क्वि. ५१ किलो उत्पादन घेऊन तृतीय क्रमांक पटकावला. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि अधिकारी यांनी या सर्वांचे अभिनंदन केले आहे.
१८०२२०२१ कोल मलगोंडा सातगोंडा टेळे
१८०२२०२१ कोल कृष्णात धोंडिराम पाटील
१८०२२०२१ कोल कृष्णात महादेव जरग
१८०२२०२१ कोल मधुकर आण्णाप्पा तेलवेकर
१८०२०२१ कोल काशिनाथ जगन्नाथ मुजुमदार
१८०२२०२१ कोल कृष्णा दादू पाटील