नेमबाजी स्पर्धेत कोल्हापूरचे राज, समरजित, पृथ्वीराज इंगळे बंधु चमकले
By सचिन भोसले | Updated: October 9, 2023 18:52 IST2023-10-09T18:51:13+5:302023-10-09T18:52:56+5:30
कोल्हापूर : पुणे येथे सोमवारी झालेल्या सिंगल व डबल ट्रॅप शाॅटगन नेमबाजी स्पर्धेत कोल्हापूरच्या राजकुंवर प्रणिल इंगळे, समरजित प्रणिल ...

नेमबाजी स्पर्धेत कोल्हापूरचे राज, समरजित, पृथ्वीराज इंगळे बंधु चमकले
कोल्हापूर : पुणे येथे सोमवारी झालेल्या सिंगल व डबल ट्रॅप शाॅटगन नेमबाजी स्पर्धेत कोल्हापूरच्या राजकुंवर प्रणिल इंगळे, समरजित प्रणिल इंगळे व पृथ्वीराज प्रकाश इंगळे या तिघांनी पाच सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पदकाची कमाई केली.
या स्पर्धेत राजकुंवर हिने सिंगल व डबल ट्रॅप कनिष्ठ गट आणि वरिष्ठ गटात चार सुवर्ण, समरजित याने डबल ट्रॅप कनिष्ठ गटात एक सुवर्ण व कनिष्ठ गटात रौप्य पदक पटकाविले. पृथ्वीराजने पुरुष गटात याच प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली.
या कामगिरीच्या जोरावर या तिघांची नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय शाॅटगन स्पर्धेसाठी निवड झाली. या तिघांना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक रियान रिझवी यांचे मार्गदर्शन, तर शाहू छत्रपती, मालोजीराजे, मधुरिमाराजे यांचे प्रोत्साहन लाभले.