शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

महिला दिन विशेष : हॉलीवूडमध्ये चमकली कोल्हापूरची कन्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 00:32 IST

अमेरिका, कतार, दुबई आणि इराक तसेच भारत या ठिकाणच्या पेट्रोलियम क्षेत्रात इंजिनीअर म्हणून काम करताना तिने मोटर स्पोर्ट्स, कार रेसिंग यासारखे छंद जोपासले.

संदीप आडनाईक

कोल्हापूर : व्यवसायाने पेट्रोलियम  इंजिनीअर असलेली कोल्हापुरातील पल्लवी यादव ही सुकन्या हॉलीवूडपटात चमकली आहे. जानेवारीत प्रदर्शित झालेल्या ‘व्हाइट टायगर’ या आंतरराष्ट्रीय सिनेमात तिने अभिनेत्री प्रियंका चोप्रासाठी ‘बॉडी डबल’ म्हणून थरारक स्टंटबाजी केली आहे. पल्लवी श्यामराव यादव हिचे येथील अंबाई डिफेन्स साेसायटी परिसरात बालपण गेले. प्राथमिक शिक्षण होलिक्रॉस कॉन्व्हेन्ट स्कूलमधून आणि महाविद्यालयीन शिक्षण राजाराम कॉलेजमधून पूर्ण केले. नंतर तिने पुण्यातून पेट्रोलियम टेक्नॉलॉजीची पदवी घेतली. पन्हाळा तालुक्यातील उंड्री हे तिच्या वडिलांचे मूळ गाव आहे. 

अमेरिका, कतार, दुबई आणि इराक तसेच भारत या ठिकाणच्या पेट्रोलियम क्षेत्रात इंजिनीअर म्हणून काम करताना तिने मोटर स्पोर्ट्स, कार रेसिंग यासारखे छंद जोपासले. येथील आशुतोष काळे यांच्याकडून प्रशिक्षण घेत तिने सुरुवातीला डर्ट बाइक रेसिंग, नंतर ऑटोक्रॉस रेसिंग आणि स्प्रिंट रॅली या प्रकारच्या कार रेसिंगमध्ये भाग घेतला. कोल्हापूरसह बंगळुरू, चंदिगड, जयपूर, भोपाळ अशा राष्ट्रीय शर्यतीतून तिने आपली ही वेगाशी स्पर्धा सुरूच ठेवली.

अडीच आठवडे चित्रीकरण२०१९ च्या ऑक्टोबरमध्ये अचानक एका हॉलीवूडच्या सिनेमासाठी बॉडी डबल म्हणजे डमीचे काम करण्याची संधी मिळाली. अरविंद अडिगा यांच्या ‘द व्हाइट टायगर’ या बुकर विजेत्या कादंबरीवर आधारित हॉलीवूडपटात अभिनेत्री प्रियंका चोप्रासाठी डमी म्हणून काही स्टंट दृश्ये साकारली. दिल्लीजवळ एका स्टेडियमवर डिसेंबर २०२० मध्ये अडीच आठवडे  याचे चित्रीकरण केले. भारतीय स्टंट दिग्दर्शक सुनील रॉड्रीग्ज यांच्यासोबत हे थरारक स्टंट करण्याची संधीही तिला मिळाली. सिनेमाच्या श्रेयनामावलीतही पल्लवीचे नाव झळकले आहे.  

यशासाठी सदैव सज्जn डिसेंबर २०२० मध्ये ओवायए या संस्थेच्या गंबाल इंडिया एन्डुरन्स ही ६० तासांच्या आत विनाथांबा कन्याकुमारी ते आग्रा अशी ३००० किलोमीटरची कार शर्यत पूर्ण केली. विशेष म्हणजे दोन्ही पायाने अपंग असलेल्या व्यक्तीचे सहचालक म्हणून तिने या शर्यतीत दुसरे स्थान पटकावले. n एशियन जिमखाना चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होऊन भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा तिचा मनोदय असून सर्वात कठीण अशा ‘रेन फॉरेस्ट चॅलेंज’सारख्या ‘ऑफ रोड रॅली’त यश मिळविण्याची तिची जिद्द आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHollywoodहॉलिवूड