बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत कोल्हापूरचे अनिकेत, श्रेयस चमकले
By सचिन भोसले | Updated: November 4, 2023 19:04 IST2023-11-04T19:03:56+5:302023-11-04T19:04:20+5:30
कोल्हापूर : भारतीय नियमाक क्रिकेट मंडळातर्फे सुरत येथे सुरु असलेल्या २३ वर्षाखालील राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत कोल्हापूरच्या अनिकेत नलवडे व ...

बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत कोल्हापूरचे अनिकेत, श्रेयस चमकले
कोल्हापूर : भारतीय नियमाक क्रिकेट मंडळातर्फे सुरत येथे सुरु असलेल्या २३ वर्षाखालील राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत कोल्हापूरच्या अनिकेत नलवडे व श्रेयस चव्हाणने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व करताना चमकदार कामगिरी केली.
सुरत येथील लालभाई काॅन्ट्रॅक्टर स्टेडीयमवर सुरु असलेल्या या स्पर्धेत शनिवारी महाराष्ट्र संघाने हिमाचल प्रदेश संघाचा ४गडी राखून पराभव केला. या सामन्यात हिमाचल संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ७ बाद ३१९ धावांचा डोंगर रचला.
त्यास उत्तरादाखल खेळताना महाराष्ट्र संघाकडून अनिकेत नलवडेच्या नाबाद शतकाच्या जोरावर ६ बाद ३२३ धावा करीत विजयावर शिक्कामोर्तब केला. अनिकेतने या सामन्यात १०५ चेंडूत नाबाद ११५ धावा केल्या. तत्पुर्वी गोलंदाजीत कोल्हापूरच्याच श्रेयस चव्हाणने नऊ षटकांत ३ गडी बाद करीत विजयात माेलाचा वाटा उचलला.