शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

‘प्र्रोमो रन’मध्ये धावले कोल्हापूरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:31 AM

कोल्हापूर : करवीरवासीयांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ‘लोकमत’ आयोजित ‘कोल्हापूर महामॅरेथॉन’चा रविवारी बिगुल वाजला. महामॅरेथॉनची रंगीत तालीम असणाºया ‘प्रोमो रन’मध्ये शेकडो आबालवृद्ध धावले. उत्साही वातावरण, नेटक्या नियोजनाने स्पर्धेमध्ये रंगत आणली.अ‍ॅथलेटिक्स खेळाला प्रोत्साहन, आरोग्य संवर्धनाचा संदेश देण्यासाठी लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे १८ फेब्रुवारीला कोल्हापुरातील सर्वांत मोठी हाफ महामॅरेथॉन होणार आहे. या स्पर्धेची पूर्वतयारी आणि ...

कोल्हापूर : करवीरवासीयांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ‘लोकमत’ आयोजित ‘कोल्हापूर महामॅरेथॉन’चा रविवारी बिगुल वाजला. महामॅरेथॉनची रंगीत तालीम असणाºया ‘प्रोमो रन’मध्ये शेकडो आबालवृद्ध धावले. उत्साही वातावरण, नेटक्या नियोजनाने स्पर्धेमध्ये रंगत आणली.अ‍ॅथलेटिक्स खेळाला प्रोत्साहन, आरोग्य संवर्धनाचा संदेश देण्यासाठी लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे १८ फेब्रुवारीला कोल्हापुरातील सर्वांत मोठी हाफ महामॅरेथॉन होणार आहे. या स्पर्धेची पूर्वतयारी आणि वातावरण निर्मितीसाठी रविवारी ‘प्रोमो रन’ घेण्यात आली. सकाळी पावणेसात वाजता पोलीस ग्राउंड येथून पाच आणि दहा किलोमीटरच्या प्रोमो रनचा फ्लॅग आॅफ महापौर स्वाती यवलुजे, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या हस्ते झाला. यावेळी महामॅरेथॉनच्या संयोजिका रुचिरा दर्डा, ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, आशिष जैन, संजय पाटील, सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉ. संजय देसाई, डॉ. संदीप पाटील, आयएम फिट क्लबचे महेश शेळके, महेंद्र ज्वेलर्सचे कुशल ओसवाल, कोल्हापूर जिल्हा अमॅच्युअर अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनचे एस. व्ही. सूर्यवंशी, कोल्हापूर स्पोर्टस् क्लबचे अध्यक्ष उदय पाटील प्रमुख उपस्थित होते.पोलीस ग्राउंड येथे पहाटे पाच वाजल्यापासून शहरवासीय, धावपटू येऊ लागले. काही वेळातच त्यांची गर्दी वाढली. गीत-संगीताच्या तालावर ‘झुम्बा डान्स’च्या माध्यमातून वॉर्म अप करून नागरिक, धावपटू हे प्रोमो रनसाठी सज्ज झाले. स्पर्धेच्या प्रारंभाच्या ठिकाणी साताºयाच्या रणरागिणी ढोल-ताशा पथकाच्या वादकांनी धावपटूंचा उत्साह वाढविला.या रनमध्ये आबालवृद्ध, शहरवासीय धावपटूंसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सहभाग घेतला. काहीजण आपले कुटुंबीय, तर मित्र-मैत्रिणींसमवेत स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यांना स्पर्धेच्या मार्गावर थांबलेले अन्य मित्र-मैत्रिणी, कुटुंबीय, नातेवाईक मोठ्या उत्साहाने ‘चिअर-अप’ करीत होते. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या होणाºया ‘कोल्हापूर महामॅरेथॉन’ची झलक धावपटूंना प्रोमो रनच्या माध्यमातून दिसून आली. नेटके नियोजन, सुसज्ज व्यवस्थेवर सहभागी स्पर्धकांनी समाधान व्यक्त करीत आता आम्ही महामॅरेथॉनच्या प्रतीक्षेत असल्याची समाधानकारक प्रतिक्रिया व्यक्त केली.महामॅरेथॉन सहभागासाठी येथे करा नोंदणीमहामॅरेथान स्पर्धेत सहभागासाठी नावनोंदणीला कोल्हापूरकर क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याकरिता ६६६.ेंँेंं१ं३ँङ्मल्ल.ूङ्मे/‘ङ्म’ँंस्र४१ या वेबसाईटसह लोकमत शहर कार्यालय (कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी), वाईल्ड क्राफ्ट स्टोअर आणि हिरेमठ इन्व्हेस्टमेंट (हिरेमठ हाईट्स, ई वॉर्ड, राजारामपुरी सहावी गल्ली), कच्छी किंग, द कलर स्नॅक्स झोन (शॉप नं. जी ४ व ५, रायसन प्रेस्टीज, मेन रोड, ताराबाई पार्क) तसेच मोबाईल नंबर ९८८१८६७६००, ९६०४६४४४९४ वर नोंदणी करा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.नेटके नियोजन, सुसज्ज व्यवस्थाप्रोमो रनसाठी ‘लोकमत’ने सुसज्ज व्यवस्था आणि नेटके नियोजन केले होते. पाच आणि दहा किलोमीटरच्या मार्गांना जोडले जाणारे सर्व रस्ते लोखंडी अडथळे उभारून बंद केले होते. रस्त्यावर दिशादर्शक, मार्गदर्शक फलक लावले होते. स्पर्धेच्या मार्गावरील प्रत्येक किलोमीटरवर ‘लोकमत’चे स्वयंसेवक उपस्थित होते. ते धावपटूंना एनर्जी ड्रिंक, पाणी देत होते. त्यांना ‘चिअर-अप’ करीत होते.पोलिसांचे सहकार्यप्रोमो रनच्या मार्गावर धावपटूंना वाहनांच्या अडथळ्याला तोंड द्यावे लागू नये, याची दक्षता शहर वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाºयांनी घेतली. पहाटे साडेचार वाजल्यापासून ते स्पर्धेच्या मार्गावर थांबून होते.