शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

भावा.. हेल्मेटपेक्षा डोस्क लय महाग हाय! पोलिसांनी काठीऐवजी पाटी दाखवल्यावर पठ्ठ्यानं उघडली डिकी, अन्..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 16:59 IST

कोल्हापूर : प्रवासासाठी 'लाल परी' सर्वात भारी, पण सद्या वाहतुकीची वर्दळ इतकी वाढलीये की, बहुतांश जण प्रवासासाठी दुचाकीला पसंती ...

कोल्हापूर : प्रवासासाठी 'लाल परी' सर्वात भारी, पण सद्या वाहतुकीची वर्दळ इतकी वाढलीये की, बहुतांश जण प्रवासासाठी दुचाकीला पसंती देतात. वेळेत ऑफिस गाठण्यासाठी दुचाकी काळाची गरज झालीये. यामुळे शहरात ट्रफिकची समस्या  वाढली आहे. कोल्हापूरही त्याला अपवाद नाही.अशातच चालकांकडून वाहतूक नियमांचे पालन होत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अपघातात अनेकांना आपला जीव गमावावा लागला आहे. प्रवासासाठी दुचाकी जितकी महत्त्वाची आहे तितकीच महत्त्वाची आहे आपली सेफ्टी. अन् त्यासाठी दुचाकीला किक मारण्याआधी हेल्मेट घालणं गरजेचे आहे. काही भागात हेल्मट सक्तीचा नियमही आहे. पण यातही लोक युक्ती वापरता अन् हेल्मेट एकतर दुचाकीला अडकवतात नाहीतर ते स्कूटीच्या डिकीत पडून राहते. हेल्मेट हाय, पण दुचाकीलाच अडकून फिरणारे आपण बऱ्याच दा बघतो. वाहतूक पोलिस अशा दुचाकीस्वारांवर कारवाई देखील करत असतात. तरी देखील कोल्हापूरकरांच्या वागण्यात काही फरक पडताना दिसत नाही. अखेर कोल्हापुरात आरटीओ अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन कोल्हापुरी भाषेतील फलक हातात घेवून नागरिकांना वाहतुकीचे नियम सांगत जनजागृती केली. यावेळी झाल असं एका दुचाकीस्वाराकडे हेल्मेट नव्हते. अधिकाऱ्यांनी त्या दुचाकीस्वारास विद्यार्थ्यांच्या हातातील फलक दाखवले. यावर लिहिलं होतं भावा.. हेल्मेटपेक्षा डोस्क लय महाग हाय! ही कोल्हापुरी पाठी दाखवताच पठ्ठ्यानं आपल्या स्कूटीची डिकी उघडत हेल्मेट काढले अन् डोक्यात घातलं.कोल्हापूर आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांनी वाहतुकीचे नियम पाळण्यासंबंधित जनजागृती मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेत महाविद्यालयीन विद्यार्थी अन् अधिकारी शहरात चौकाचौकात कोल्हापूरी भाषेतील फलक हाती घेवून वाहन चालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन करत होते. "हेल्मेट पेक्षा डोस्क लय महाग हाय?"; हेल्मेट फुटलं तर दुसरं घेशील, डोस्क फुटलं तर कुटणं आणणार?" या फलकाबाजीसह हेल्मट वापरा सुरक्षित प्रवास करा, असा संदेश देण्यात आला.चार चाकी वाहनांसाठी "भावा सीट बेल्ट लाव नाहीतर डायरेक्ट ढगात" अशी फलकबाजी करून नियम समजावण्यात आला. जनजागृतीवेळी काठी अन् दंडात्मक कारवाई न करता हेल्मट घालणाऱ्या आणि सीट बेल्ट वापरणाऱ्यांना गुलाबाचं फूल अन् नियम न पाळणाऱ्यांना पोलिसांकडून झेंडूच फूल देण्यात आलं.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTrafficवाहतूक कोंडीPoliceपोलिसRto officeआरटीओ ऑफीस