शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

कोल्हापूरमध्ये होणार बहुमजली पार्किंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 10:46 AM

दर्शन मंडपाची जागा निश्चित होत नसल्याने दुस-या प्राधान्यक्रमाने केला जाणारा बहुमजली वाहनतळ प्रकल्प राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला.

ठळक मुद्देव्ही. के. पाटील यांची ६.३० टक्के कमी दराची निविदास्थायी समितीच्या सभेत त्यावर मंजुरीची मोहोर उमटविली जाण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडाअंतर्गत ताराबाई रोडवरील बाबूजमाल दर्ग्यासमोर उभारण्यात येणाऱ्या बहुमजली वाहनतळाचे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कामाकरिता मागविण्यात आलेल्या व्यावसायिक तसेच तांत्रिक निविदांची छाननी पूर्ण झाली असून, त्यांवर आता स्थायी समितीची मोहोर उमटविणे बाकी राहिले आहे. कदाचित पुढील आठवड्यात कामाची वर्क आॅर्डर दिली जाईल.

शहरात येणा-या भाविक तसेच पर्यटकांच्या सोयीकरिता बहुमजली वाहनतळ उभारणे आवश्यक होते. २००९ मध्ये अशा प्रकारच्या वाहनतळास केंद्र सरकारची मंजुरी मिळाली होती; परंतु अंबाबाई मंदिराजवळील विद्यापीठ हायस्कूल व मध्यवर्ती बसस्थानक येथे वाहनतळ उभारण्यात अडचणी आल्या; त्यामुळे गेल्या १० वर्षांपासून हा प्रकल्प रखडला होता.अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात या कामाचे नियोजन नव्याने समाविष्ट करण्यात आल्यामुळे बहुमजली वाहनतळाचा विषय पुन्हा चर्चेत आला. आराखडा मंजूर झाल्यानंतर त्यातील सात कोटींचा पहिला हप्ता महापालिका प्रशासनाकडे जमा झाला आहे. दर्शन मंडपाची जागा निश्चित होत नसल्याने दुस-या प्राधान्यक्रमाने केला जाणारा बहुमजली वाहनतळ प्रकल्प राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला.

सात कोटी ८४ लाखांच्या या कामासाठी आॅक्टोबर महिन्यात निविदा मागविण्यात आल्या होत्या. पहिल्या वेळेस निविदांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून मुदतवाढ देण्यात आली. त्यावेळी मात्र तीन ठेकेदारांनी काम करण्यास तयारी दर्शविली. एस अ‍ॅँड जे (सावरे आणि जिंदे), शिवप्रसाद कन्स्ट्रक्शन, पुणे आणि कोल्हापूरचे व्ही. के. पाटील इंजिनिअरिंग अ‍ॅँड कन्स्ट्रक्शन अशा तिघांनी निविदा भरल्या होत्या. त्यामध्ये व्ही. के. पाटील यांची निविदा ६.३० टक्के कमीची (बिलो) आहे. व्ही. के. पाटील यांना काम देण्याच्या प्रस्तावावर आयुक्तांची स्वाक्षरी झाली असून, हा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी जाणार आहे. आज, शुक्रवारी होणा-या किंवा पुढील आठवड्यात होणा-या स्थायी समितीच्या सभेत त्यावर मंजुरीची मोहोर उमटविली जाण्याची शक्यता आहे.कोणा आहेत व्ही. के. पाटील?व्ही. के. पाटील हे कोल्हापूरचे सुपुत्र आहेत. दर्जा आणि गुणवत्ता या बाबतींत बांधकाम क्षेत्रात त्यांचा नावलौकिक आहे. रंकाळा तलावाच्या ऐतिहासिक संरक्षक भिंतीचे काम, शाहू खासबाग मैदानाचे सुशोभीकरण तसेच नर्सरी बागेतील शाहू समाधिस्थळाचे काम व्ही. के. पाटील यांनी केले आहे.- असे असेल बहुमजली पार्किंग -- ठिकाण- सरस्वती टॉकीजसमोरील पार्किंगमध्ये- इमारतीचे स्वरूप - तीन मजली- कार पार्किंग क्षमता - १६४- दुचाकी- १५९- चालकांसाठी सुविधा- रेस्ट रूम 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरParkingपार्किंग