शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जि.प.च्या सभापतीनिवडी बिनविरोध; नांदेकर, यादव, पाटील, गायकवाड यांची झाली निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 16:27 IST

महाविकास आघाडीने भरलेले अर्ज राष्ट्रवादीचे गटनेते सुधीर देसाई यांनी केलेल्या विनंतीनुसार आणि आमदार सतेज पाटील यांच्या सुचनेनुसार मागे घेतले

कोल्हापूर : अपेक्षेप्रमाणे जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती निवडी सोमवारी बिनविरोध पार पडल्या. सारिका यशवंत नांदेकर (शिंदेसेना) यांची बांधकाम आणि आरोग्य सभापतिपदी, शीतल प्रवीण यादव (जनसुराज्य) यांची शिक्षण व अर्थ सभापतिपदी, विद्या विलास पाटील (राष्ट्रवादी अजित पवार पक्ष) यांची महिला बालकल्याणपदी तर श्रद्धा गायकवाड (यड्रावकर यांची शाहू आघाडी) यांची समाजकल्याण समिती सभापतिपदी निवड करण्यात आली.महाविकास आघाडीने या चारही सभापतिपदांसाठी भरलेले अर्ज राष्ट्रवादीचे गटनेते सुधीर देसाई यांनी केलेल्या विनंतीनुसार आणि आमदार सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार मागे घेतले आणि बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब झाले. निवड सभेच्या पीठासन अधिकारी म्हणून करवीर प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांनी काम पाहिले. यावेळी करवीर तहसीलदार स्वप्निल पवार, जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले उपस्थित होते.दुपारी २ वाजता सभेच्या कामकाजास सुरुवात झाली. तत्पूर्वी १० ते १२ या वेळेत महायुतीच्या चार महिला उमेदवारांनी तसेच महाविकास आघाडीच्यावतीने विषय समित्यांसाठी सागर पांडुरंग धुंदरे (काँग्रेस), सुदर्शन खोत (काँग्रेस), संयोगीता रणजित मोरे (काँग्रेस) आणि नंदिनी कांबळे (स्वाभिमानी) यांनी अर्ज दाखल केले होते. दुपारी दीडनंतर राष्ट्रवादीचे गटनेते सुधीर देसाई, जिल्हा बँकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर, सर्जेराव पाटील-पेरिडकर, विजयसिंह माने, यांनी काँग्रेसचे गटनेते एकनाथ पाटील, अभिजित तायशेटे, अमर पाटील यांच्याशी ‘बिनविरोध’बाबत चर्चा सुरू ठेवली होती.

सभागृहात प्रारंभी राष्ट्रगीत, राज्यगीत झाल्यानंतर अर्ज छाननी प्रक्रिया पार पाडण्यात आली. अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांची मुदत देण्यात आली तेव्हा राष्ट्रवादीचे गटनेते सुधीर देसाई यांनी पुन्हा सर्व सदस्यांच्या साक्षीने काँग्रेसचे गटनेते एकनाथ पाटील यांना ‘बिनविरोध’चे आवाहन केले. त्यानुसार पाटील यांनी निवडून निर्णय अधिकाऱ्यांकडून माघारीचे अर्ज आणून महाविकासच्या चारही उमेदवारांच्या सह्या घेऊन माघार घेतली. त्यानंतर पीठासन अधिकारी मौसमी चौगुले यांनी निवडून आलेल्या चारही महिला सभापतींच्या नावांची घोषणा केली. त्यानंतर अध्यक्षा शिल्पा खोत आणि उपाध्यक्ष तानाजी पाटील यांना व्यासपीठावर पाचारण करण्यात आले आणि नूतन सभापतींचा सत्कार करण्यात आला.

अध्यक्षांनी जाहीर केल्या समित्याया निवड प्रक्रियेत महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापतिपदाच्या निवडी या त्याच पदांसाठी असतात परंतु उर्वरित दोन समित्यांची नावे निश्चित नसतात. त्या फक्त विषय समिती सभापती संबोधण्यात येते. निवडीनंतर अध्यक्षा शिल्पा खोत यांनी नांदेकर यांना बांधकाम आणि आरोग्य तर यादव यांना शिक्षण आणि अर्थसमिती देण्यात येत असल्याचे जाहीर केले.

मला माझे काम करू द्यासुधीर देसाई यांनी सभागृहात ‘बिनविरोध’चे आवाहन केल्यानंतर आणखी काहीजण बोलण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा मौसमी चौगुले यांनी मला माझे काम करू द्या. कोणावरही बोलून दबाव टाकू नका. ज्यांनी वैयक्तिक अर्ज भरले आहेत. त्यांनी वैयक्तिकरित्या माघार घ्यायची की नाही याची भूमिका घेऊ देत, असे स्पष्टपणे सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur ZP Chairperson Elections Unopposed; Nande, Yadav, Patil, Gaikwad Elected

Web Summary : Kolhapur Zilla Parishad's committee chairperson elections were unopposed. Sarika Nandekar, Sheetal Yadav, Vidya Patil, and Shraddha Gaikwad were elected as chairpersons for various committees after the Maha Vikas Aghadi withdrew nominations following requests from leaders.