शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

खुल्या जागांबाबत  कोल्हापूर जिल्हा परिषदेचे प्रशासन उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 17:04 IST

खुल्या जागा ताब्यात घेण्याचा मुद्दा जिल्हा परिषदेने अर्धवट सोडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याआधीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार आणि ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी

ठळक मुद्देसुरू केलेले प्रयत्न सोडले अर्धवट, मोहीम हाती घेण्याची गरज

समीर देशपांडे 

 कोल्हापूर : खुल्या जागा ताब्यात घेण्याचा मुद्दा जिल्हा परिषदेने अर्धवट सोडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याआधीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार आणि ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी याबाबत नियोजन केले होते. मात्र आता हा मुद्दा मागे पडला आहे. 

गेले दोन वर्षे विविध वसाहती विकसित झाल्यानंतर त्यातील खुल्या जागा ताब्यात घेण्याबाबत जिल्हा परिषद प्रयत्न करीत आहे. यासाठी एक फॉर्मही तयार करण्यात आला असून, गेल्या वर्षी हा फॉर्म गटविकास अधिकाऱ्यांना पाठवून माहिती मागविण्यात आली होती. मात्र सहा महिने उलटले तरी ही माहिती जिल्हा परिषदेला मिळाली नव्हती. ग्रामपंचायतींच्या खुल्या जागांचा ताबा देण्यासाठी मूळ मालक कधीच तयार होत नाही आणि ग्रामपंचायतीची यंत्रणाही त्यासाठी फारसे प्रयत्न करीत नाही. गावपातळीवर लागेबांधे असल्याने अनेकदा यासाठी पाठपुरावाही केला जात नाही. परिणामी अनेक वर्षे ही जागा मूळ मालकाच्या नावेच राहते आणि मग महसूल खात्यातील ‘नेमक्यांना’ गाठून गुंठेवारी करून ही सार्वजनिक जागाही विकून खाण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. दीड वर्षापूर्वी  ‘लोकमत’ने हा विषय ऐरणीवर आणला. अशातच पाचगाव, शिंगणापूर येथे सार्वजनिक जागाही घशात घालण्याचे प्रकार उघडकीस आले. 

‘लोकमत’ने याबाबत वस्तुस्थिती मांडल्यानंतर याबाबत हालचाली गतिमान झाल्या होत्या. करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी तर यासाठी जिल्हा परिषदेत करवीर तालुक्यातील मोठ्या गावांतील ग्रामसेवकांची बैठकही घेतली होती. इच्छाशक्तीचा अभावशासनाचा याबाबत नियम असतानाही तो धाब्यावर बसवून अनेक रिकाम्या जागा घशात घालण्याचे प्रकार सुरू आहेत. मोठमोठ्या शहरांजवळील जागांच्या किमती प्रचंड असल्याने महसूल विभागाच्याअधिकाऱ्यांना हाताशी धरून गुंठेवारी करून या जागा विकल्या जात आहेत. तरीही जिल्हा परिषदेकडून याबाबत ठोस कारवाई होत नसल्याचे चित्र समोर आले असून केवळ इच्छाशक्तीचा अभाव हेच यामागील कारण असल्याचे दिसते. ..............................मानसिकता तयार झालीयगेली दोन वर्षे ‘लोकमत’ने हा विषय लावून धरला आहे. त्यामुळे शिंगणापूर येथील खुल्या जागा विक्रीची गुंठेवारी मंजूर करणाºया प्रांताधिकाऱ्यांनाही दणका बसला असून, ही मंजुरी रद्द करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागानेही मध्यंतरी चांगली वातावरण निर्र्मिती केली होती. सचिन इथापे यांनी बैठक घेतल्यानंतर अशा खुल्या जागा ग्रामपंचायतीकडे जमा करण्याची मानसिकता झाली होती. मात्र पुन्हा हे प्रयत्न थंडावले आहेत.  

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर