शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : गिरणीच्या पट्यात अडकून महिला ठार, पन्हाळा तालुक्यातील सावर्डे तर्फ असंडोली येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 18:08 IST

सावर्डे तर्फ असंडोली (ता. पन्हाळा) येथे दळप दळताना गिरणीच्या पट्ट्यात पदर आडकून महिला ठार झाली. मेघा मारुती पाटील (वय २९, रा. सावर्डे तर्फ आसंडोली, ता. पन्हाळा) असे त्यांचे नाव आहे. गावातील केदारलिंग विकास सोसायटीच्या गिरणीत हा प्रकार घडला. पन्हाळा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

ठळक मुद्दे गिरणीच्या पट्यात अडकून महिला ठारपन्हाळा तालुक्यातील सावर्डे तर्फ असंडोली येथील घटना

कोल्हापूर : सावर्डे तर्फ असंडोली (ता. पन्हाळा) येथे दळप दळताना गिरणीच्या पट्ट्यात पदर आडकून महिला ठार झाली. मेघा मारुती पाटील (वय २९, रा. सावर्डे तर्फ आसंडोली, ता. पन्हाळा) असे त्यांचे नाव आहे. गावातील केदारलिंग विकास सोसायटीच्या गिरणीत हा प्रकार घडला. पन्हाळा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.अधिक माहिती अशी, मेघा पाटील या शनिवारी दुपारी गावातील केदारलिंग विकास सोसायटीच्या गिरणीत धान्य दळण्यासाठी गेल्या होत्या. धान्याचा डबा ठेवून त्या गिरणीच्या पट्याजवळ थांबल्या असताना त्यांच्या साडीचा पदर पट्ट्यात अडकल्याने त्या ओढल्या गेल्या.

पट्ट्यात अडकून गिरणीवर आपटल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दूखापत होवून बेशुध्द पडल्या. हा प्रकार लक्षात येताच गिरणीतील कर्मचाऱ्याने परिसरातील नागरिकांना बोलवून घेतले.

जखमी मेघा यांना सीपीआरमध्ये दाखल असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या अपघाती मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत पन्हाळा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. 

 

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर