शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

महिलेला दीड महिना साखळदंडाने बांधून ठेवले, कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार, समोर आलं असं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 16:28 IST

Kolhapur Crime News: एका ४० वर्षीय महिलेला तिच्याच कुटुंबीयांनी साखळदंडाने बांधून त्याला कुलूप लावून ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोल्हापूरमधील राजारामपुरी भागात हा संतापजनक प्रकार घडला असून, पोलिसांनी पीडित महिलेची सुटका केली आहे.

एका ४० वर्षीय महिलेला तिच्याच कुटुंबीयांनी साखळदंडाने बांधून त्याला कुलूप लावून ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोल्हापूरमधील राजारामपुरी भागात हा संतापजनक प्रकार घडला असून, पोलिसांनी पीडित महिलेची सुटका केली आहे.

एका महिलेला तिच्या कुटुंबीयांनी साखळदंडाने बांधून घरात कोंडून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा ही महिला साखळदंडाने बांधलेल्या आणि त्याला कुलूप लावलेल्या स्थितीत होती. त्यानंतर पोलिसांनी त्या महिलेची सुटका केली.

दरम्यान, या महिलेला तिच्याच कुटुंबीयांनी बांधून ठेवले होते, अशी माहिती समोर आली आहे. सुटका करण्यात आली तेव्हा पीडित महिला ही बिकट अवस्थेत होती. तिला धड चालताही येत नव्हते. मी घराबाहेर पडून जाऊ नये म्हणून मला बांधून ठेवलं होतं, असा दावा या महिलेनं केला आहे. या महिलेचं वय सुमारे ४० वर्षे असून, ती गतिमंद असल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिला साखळदंडाने बांधून ठेवले होते, असे सांगण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले की, ही महिला भाचा, तिचे भाऊ आणि भावाची पत्नी यांच्यासोबत राहते. गेल्या एक ते दीड महिन्यांपासून बांधलेल्या अवस्थेत आहे, अशी माहिती ती महिला देत आहे. तिची प्रकृती बिघडलेली असल्याने तिला प्राथमिक उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर