कोल्हापूर :  अल्पसंख्याक शाळांचे प्रश्न सोडवणार : अराफत  शेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 05:34 PM2018-11-14T17:34:26+5:302018-11-14T17:35:41+5:30

राज्यातील अल्पसंख्याक शाळांसमोर विविध प्रश्न असून, ते प्राधान्याने सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी दिली.

Kolhapur: Will solve problems of minority schools: Arafat Sheikh | कोल्हापूर :  अल्पसंख्याक शाळांचे प्रश्न सोडवणार : अराफत  शेख

कोल्हापूर :  अल्पसंख्याक शाळांचे प्रश्न सोडवणार : अराफत  शेख

googlenewsNext
ठळक मुद्दे अल्पसंख्याक शाळांचे प्रश्न सोडवणार : अराफत  शेख कृती आराखडा शेख यांच्यासमोर सादर

कोल्हापूर : राज्यातील अल्पसंख्याक शाळांसमोर विविध प्रश्न असून, ते प्राधान्याने सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी दिली.

अल्पसंख्याक शाळांच्या विविध समस्यांबाबत मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी अराफत शेख यांची कोल्हापुरात भेट घेतली. मुख्याध्यापक सचिव दत्ता पाटील यांनी अल्पसंख्याक शाळांसमोरील समस्या व त्याची कोणत्या प्रकारे सोडवणूक करता येईल, याचा कृती आराखडा शेख यांच्यासमोर सादर केला.

शाळा कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना एन. एम. एस. शिष्यवृत्ती किंवा अल्पसंख्याक शिष्यवृत्ती या दोन्ही एक शिष्यवृत्ती द्यावी, अशी मागणी केली. एन. एम. एस. शिष्यवृत्ती ही गुणवत्ता धारकांसाठी असल्याने तो फक्त अल्पसंख्याक विद्यार्थी म्हणून डावलणे योग्य नसल्याचे पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.

अल्पसंख्याक शाळांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, त्यांच्या सोडवणुकीसाठी आपण प्रयत्नशील असून, थोड्याच दिवसांत उपाययोजनांची अंमलबजावणी झालेली दिसून येईल, अशी ग्वाही अराफत शेख यांनी दिली. यावेळी इरफान अन्सारी, अशोक हुबळे, शिवाजी कोरवी, श्रेणीक पाटील, एम. एम. कांबळे, गणेश बाटे, राजकुमार चौगुले, आदी उपस्थित होते.
 

 

Web Title: Kolhapur: Will solve problems of minority schools: Arafat Sheikh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.