Kolhapur: डॉ.नंदाताई बाभूळकर पुन्हा राजकारणात सक्रीय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 09:27 AM2024-02-18T09:27:50+5:302024-02-18T09:28:25+5:30

Dr. Nandatai Babhulkar: विधानसभेचे माजी अध्यक्ष दिवंगत बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या, नागपूर येथील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ.नंदिनी सुश्रुत बाभूळकर यांचा आज, रविवारी (१८) गडहिंग्लजमध्ये रत्नमाला घाळी 'नारी शक्ती' पुरस्काराने गौरव होत आहे.

Kolhapur: Will Dr. Nandatai Babhulkar be active in politics again? | Kolhapur: डॉ.नंदाताई बाभूळकर पुन्हा राजकारणात सक्रीय होणार?

Kolhapur: डॉ.नंदाताई बाभूळकर पुन्हा राजकारणात सक्रीय होणार?

- राम मगदूम
कोल्हापूर - विधानसभेचे माजी अध्यक्ष दिवंगत बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या, नागपूर येथील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ.नंदिनी सुश्रुत बाभूळकर यांचा आज, रविवारी (१८) गडहिंग्लजमध्ये रत्नमाला घाळी 'नारी शक्ती' पुरस्काराने गौरव होत आहे.यानिमित्ताने त्यांच्या वैद्यकीय, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कामगिरीला  उजाळा मिळाला असून कुपेकरप्रेमींनी त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छादेखील  'जाहीर'पणे दिल्या आहेत. त्यामुळे'चंदगड'च्या राजकारणात ' त्या' पुन्हा सक्रीय होणार कां? याचीच गडहिंग्लज विभागासह जिल्हयात चर्चा आहे.

२०१२ मध्ये बाबासाहेब कुपेकर यांचे आकस्मिक निधन झाले.त्यानंतर शरद पवारांनी 'चंदगड'च्या पालकत्वाची जबाबदारी  कुपेकरांच्या पत्नी संध्यादेवी यांच्यावरच टाकली.त्यावेळी नंदाताई हिमतीने आईच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या.त्यामुळे संध्यादेवी दोनवेळा आमदार झाल्या.परंतु,त्यांच्या यशस्वी वाटचालीच्या खऱ्या सूत्रधार नंदाताईच राहिल्या.

दरम्यान, संध्यादेवींनी प्रकृती आणि  वयोमानामुळे गेल्यावेळची निवडणूक लढविण्यास  असमर्थता दाखवली.त्यामुळे नंदाताईंनी निवडणूक लढवावी,असा नेतृत्वाबरोबरच  कार्यकर्त्यांचाही आग्रह होता.त्यामुळे नकारानंतरही पुन्हा लढण्याची तयारी त्यांनी दाखवली होती.परंतु, उमेदवारी दाखल करण्यासाठी 'चंदगड'ला येत असतानाच  नागपूरच्या विमानतळावरून अचानकपणे त्या माघारी परतल्या.म्हणूनच,राजेश पाटील यांना संधी मिळाली.

म्हणूनच, दोन्हीकडून 'ऑफर' !
दीर्घकाळ रखडलेल्या उचंगी प्रकल्पाला पूर्णत्व,कोवाड,कुरणी,हडलगे या पूलांचे बांधकाम, चंदगड नगरपंचायत,ट्रामा केअर सेंटर मंजुरी आणि प्रदूषणकारी एव्हीएच प्रकल्प हलकर्णी एमआयडीसीतून हद्दपार करण्याबरोबरच राज्यात 'भाजप'ची सत्ता असतानाही 'चंदगड'च्या विकासासाठी कोट्यवधीचा निधी मिळवण्यात नंदाताईंनी महत्वाची भूमिका बजावली होती.म्हणूनच,गेल्यावेळी  राष्ट्रवादीसह भाजपानेही त्यांना उमेदवारीची 'ऑफर' दिली होती.

'नंदाताईं'च्या पुनरागमनाविषयी उत्सुकता
शरद पवारांच्या वाटचालीतील प्रत्येक राजकीय वळणावर कुपेकर त्यांच्यापाठीशी हयातभर खंबीरपणे राहिले.'राष्ट्रवादी'तील फुटीनंतर संध्यादेवीदेखील शरद पवारांच्यासोबत आहेत. कोल्हापूरच्या सभेलाही त्या उपस्थित होत्या.त्यामुळे पवारांनी 'शब्द' टाकल्यास नंदाताईंना यावेळी नकार देता येणार नाही.म्हणूनच,कुपेकरप्रेमींसह सर्वांनाच  ताईंच्या पुनरागमनाविषयी उत्सुकता आहे.

मुश्रीफांचे भाकीत, समर्थकांच्या शुभेच्छा !
'एव्हीएच'विरोधातील लढाई जिंकल्यानंतर हसन मुश्रीफांही नंदाताईंचे जाहीरपणे कौतुक केले होते.'आज शाहु महाराज असते तर त्यांनी नंदाताईंची बग्गीतून मिरवणूक काढली असती.त्यांच्या सासर- माहेरच्यांनी संमती दिली तर त्या  चंदगडच्या भावी आमदार असतील' असे भाकीतही त्यांनी केले होते.पण,नंदाताईंनी निवडणूकच लढवली नाही.पाचवर्षांपासून त्या राजकारणापासूनही दूर आहेत.तरिदेखील पुरस्काराच्या निमित्ताने अजित पवार - मुश्रीफ समर्थकांनी ताईंच्या 'भावी वाटचाली'साठी शुभेच्छा दिल्या आहेत,त्याचीच विशेष चर्चा आहे.

नंदाताईंच्या 'भाषणा'कडे सर्वांचे लक्ष!
आईसाहेब व आपण कुणीही विधानसभा निवडणूक लढवणार नाही हे जाहीर करताना  नंदाताई अत्यंत भावूक झाल्या होत्या. त्यानंतर कुठल्याही राजकीय कार्यक्रमाला त्या आल्या नाहीत.त्यामुळे पुरस्काराला उत्तर देताना काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Kolhapur: Will Dr. Nandatai Babhulkar be active in politics again?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.