कोल्हापूर, हातकणंगलेचे खासदार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 12:46 AM2019-04-23T00:46:09+5:302019-04-23T00:46:16+5:30

कोल्हापूर । कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदार संघांत अत्यंत अटीतटीची दुरंगी लढत होत आहे. कोल्हापुरात राष्टÑवादीचे खासदार ...

Kolhapur, who is a member of Hatkanangle? | कोल्हापूर, हातकणंगलेचे खासदार कोण?

कोल्हापूर, हातकणंगलेचे खासदार कोण?

googlenewsNext

कोल्हापूर । कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदार संघांत अत्यंत अटीतटीची दुरंगी लढत होत आहे. कोल्हापुरात राष्टÑवादीचे खासदार धनंजय महाडिक व शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्यात दुसऱ्यांदा सामना होत आहे, तर खासदार राजू शेट्टी हे रिंगणात असल्याने हातकणंगलेच्या लढतीकडे महाराष्ट्रासह देशाच्या शेतकरी चळवळीचे लक्ष आहे. त्यांच्यासमोर शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी आव्हान उभे केले आहे. या दोन्ही मतदारसंघांतील दुरंगी लढतीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मिळणारी मते कुणाची डोकेदुखी ठरतात याचाही फैसला आज, मंगळवारी (दि. २३) होणाºया मतदानाने होणार आहे.

मतदार यादीत
नाव कसे शोधाल?
ँ३३स्र२://ूीङ्म.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल
या संकेतस्थळावर गेल्यानंतर डाव्या बाजूला दिलेल्या
लिंकवरील इलेक्ट्रोल सर्ज इंजिनवर क्लिक करा.
नावानुसार आणि आयडी कार्डनुसार इथे नाव तपासता येते.
नावानुसार तपासायचे असेल तर त्यावर क्लिक केल्यानंतर जिल्ह्यानुसार किंवा विधानसभानुसार असे दोन पर्याय दिले आहेत.
विधानसभा मतदारसंघानुसार नाव तपासायचे असेल तर त्यावर क्लिक करावे. जिल्हा, मतदारसंघ, नाव अशी माहिती टाकल्यानंतर सर्चवर क्लिक केल्यानंतर यादीतील तुमचे नाव दिसेल.
ँ३३स्र२://६६६.ल्ल५२स्र.्रल्ल
या संकेतस्थळावर गेल्यानंतर सर्च युवर नेम इन इलेक्टोरल रोल वर क्लिक करा. राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल में आपका स्वागत है, असे वाक्य झळकेल.
मतदान केंद्राची माहिती जाणून घेऊ शकता.
या माहितीची प्रिंटही काढता येते.
मतदार यादीत नाव नोंदविणे, नाव शोधणे,
नावात पत्त्यात बदल करण्यासाठी अर्ज करू शकता.
बीएलओची माहितीही मिळू शकेल. निवडणूक अधिकाºयाची माहितीही यावर उपलब्ध आहे. कंटिन्यू या लिंकवर क्लिक केल्यानंतर दोन पद्धतीने नाव शोधण्याची सुविधा उपलब्ध आहे. नाव, वय, जन्मतारीख, राज्य, जिल्हा, जिल्हा विधानसभा क्षेत्र ही माहिती टाकल्यानंतर मतदार यादीत नाव शोधता येते. यासह मतदार ओळखपत्र क्रमांक टाकूनही नाव शोधता येते.

मतदारांसाठी ४९१५ व्हीव्हीपॅट
लोकसभा निवडणुकीत पारदर्शी मतदान व्हावे, यासाठी प्रथमच ४९१५ व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरीफायबल पेपर आॅडिट्रेल) यंत्राचा वापर केला जाणार आहे. यामध्ये कोल्हापूर मतदारसंघासाठी २९४० व हातकणंगले मतदारसंघासाठी १९७५ ‘व्हीव्हीपॅट’चा समावेश आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केले आहे. मतदान केल्यानंतर सात सेकंदांमध्ये मतदाराला पावती मिळेल. त्यावर निवडणूक चिन्ह, नाव व उमेदवाराचा मतपत्रिकेतील अनुक्रमांक नमूद असेल.
३५० केंद्रांतून होणार लाईव्ह वेब कास्ट
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील एकूण मतदान केंद्रांपैकी २१७ केंद्रांतील व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील १३३ केंद्रांतील मतदान प्रक्रिया थेट लाईव्ह वेब कास्ट करण्यात येणार आहे. त्या केंद्रातील हालचालींवर निवडणूक आयोग थेट लक्ष ठेवणार आहे. विशेष म्हणजे हे थेट प्रक्षेपण केवळ निवडणूक विभागच पाहू शकणार आहे.

कोल्हापूर मतदारसंघ
उमेदवाराचे नाव पक्ष
धनंजय महाडिक राष्टÑवादी कॉँग्रेस
संजय मंडलिक शिवसेना
डॉ. अरुणा माळी वंचित बहुजन आघाडी
दयानंद कांबळे बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी
दुंडाप्पा श्रीकांत बहुजन समाज पार्टी
किसन काटकर बळिराजा पार्टी
सिद्धार्थ नागरत्न बहुजन मुक्ती पार्टी
संदीप संकपाळ अपक्ष
परेश भोसले अपक्ष
संदीप कोगले अपक्ष
बाजीराव नाईक अपक्ष
युवराज देसाई अपक्ष
अरविंद माने अपक्ष
मुश्ताक मुल्ला अपक्ष
राजेंद्र कोळी अपक्ष

हातकणंगले मतदारसंघ
राजू शेट्टी स्वाभिमानी पक्ष
धैर्यशील माने शिवसेना
अस्लम सय्यद वंचित बहुजन आघाडी
रघुनाथ पाटील अपक्ष
डॉ. प्रशांत गंगावणे बहुजन रि. सो. पार्टी
अजय कुरणे बहुजन समाज पार्टी
मदन वजीर सरदार बहुजन मुक्ती पार्टी
राजू मुजीकराव शेट्टी बहुजन महा पार्टी
विद्यासागर ऐतवडे अपक्ष
डॉ. नितीन भाट अपक्ष
किशोर पन्हाळकर अपक्ष
संग्रामसिंह गायकवाड अपक्ष
विजय चौगुले अपक्ष
संजय अग्रवाल अपक्ष
आनंदराव सरनाईक अपक्ष
महादेव जगदाळे अपक्ष
विश्वास कांबळे अपक्ष

Web Title: Kolhapur, who is a member of Hatkanangle?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.