कोल्हापूर : आयटीआय चौकात एअर व्हॉल्व्ह खराब झाल्याने लाखो लिटर पाणी वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 17:48 IST2018-05-22T17:48:38+5:302018-05-22T17:48:38+5:30
आयटीआय चौकातून जाणाऱ्या ११०० एम. एम. जाडीच्या जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व्ह अचानक नादुरुस्त झाल्यामुळे मंगळवारी पहाटे लाखो लिटर पाणी वाहून गेले. ही बाब पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना कळताच या व्हॉल्व्हची तातडीने दुरुस्ती करण्यात आली. या प्रकारामुळे मंगळवारी राजारामपुरी परिसरात उशिरा पाणीपुरवठा झाला.

कोल्हापूर शहरातील आयटीआय परिसरातील जलवाहिनीच्या एअर व्हॉल्व्हला अचानक गळती लागल्याने मंगळवारी पहाटे लाखो लिटर पाणी वाया गेले. महापालिका कर्मचाºयांनी तातडीने पाणीपुरवठा बंद करून ही गळती काढली.
कोल्हापूर : आयटीआय चौकातून जाणाऱ्या ११०० एम. एम. जाडीच्या जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व्ह अचानक नादुरुस्त झाल्यामुळे मंगळवारी पहाटे लाखो लिटर पाणी वाहून गेले. ही बाब पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना कळताच या व्हॉल्व्हची तातडीने दुरुस्ती करण्यात आली. या प्रकारामुळे मंगळवारी राजारामपुरी परिसरात उशिरा पाणीपुरवठा झाला.
शिंगणापूर पाणीपुरवठा योजनेवरील जलवाहिनीला चंबुखडी व कणेरकरनगर येथे लागलेल्या गळतीमुळे सोमवारी (दि. २१) दिवसभर पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. रात्री साडेबारा वाजता काम पूर्ण झाल्यानंतर दीड वाजता पाणी उपसा सुरू झाला.
त्यानंतर पहाटे चार वाजता पुईखडी येथून शुद्ध पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. त्यावेळी जलवाहिनीतील हवेच्या दाबाने आयटीआय चौकातील एअर व्हॉल्व्ह अचानक लॉक होऊन नादुरुस्त झाला. त्यामुळे तेथून पुढे पाणी जायचे बंद झाले. या व्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात पाणीगळती सुरू झाली.
या व्हॉल्व्हमधून पहाटेच्या वेळी मोठ्या प्रमाणात कारंजा उडू लागला. सुमारे दोन तासांत लाखो लिटर पाणी वाहून गेले. ही बाब पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना कळताच त्यांनी तत्काळ पुईखडी येथून पाणीपुरवठा बंद केला.
तसेच तातडीने व्हॉल्व्हची दुरुस्ती हाती घेतली. काम पूर्ण होताच सकाळी सातनंतर पाणीपुरवठा नियमितपणे सुरू झाला. या सगळ्या प्रकाराने राजारामपुरी परिसराला मंगळवारी उशिरा आणि तेही कमी दाबाने पाणीपुरवठा झाला.