कोल्हापूर : दुधाळी शूटिंग रेंजला आमदार पाटील, महापौरांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 11:57 IST2018-10-09T11:55:30+5:302018-10-09T11:57:06+5:30
महानगरपालिकेच्या दुधाळी येथील शूटिंग रेंजला आमदार सतेज पाटील, महापौर शोभा बोंद्रे यांनी भेट देऊन पाहणी केली. जिल्हा नियोजन समितीमधून मिळालेल्या निधीतून बांधण्यात आलेल्या अद्ययावत शूटिंग रेंजची त्यांनी फिरुन पाहणी केली. क्रीडा संकुल ज्या शूटिंग रायफल खरेदी करणार आहेत त्याच कंपनीच्या रायफल खरेदी केल्या जाणार असल्याचे यावेळी महापालिकेतर्फे स्पट करण्यात आले.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या दुधाळी येथील अद्ययावत शूटिंग रेंजला आमदार सतेज पाटील, महापौर शोभा बोंद्रे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी शारंगधर देशमुख, प्रतापसिंह जाधव, अजित पाटील उपस्थित होते.
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या दुधाळी येथील शूटिंग रेंजला सोमवारी सतेज पाटील, महापौर शोभा बोंद्रे यांनी भेट देऊन पाहणी केली. जिल्हा नियोजन समितीमधून मिळालेल्या निधीतून बांधण्यात आलेल्या अद्ययावत शूटिंग रेंजची त्यांनी फिरुन पाहणी केली. क्रीडा संकुल ज्या शूटिंग रायफल खरेदी करणार आहेत त्याच कंपनीच्या रायफल खरेदी केल्या जाणार असल्याचे यावेळी महापालिकेतर्फे स्पट करण्यात आले.
याठिकाणी आवश्यक साधन सामग्री याची माहिती घेताना त्यांनी सदरचे साहित्य खरेदी करण्याकरिता लवकरात लवकर निविदा काढण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. येथे २५ मीटर रेंजसाठी कंपौंडवॉल व इतर सुविधेसाठी आवश्यक तो निधी आपल्या फंडातून देऊ. त्यासाठी तसा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना उपशहर अभियंता एस. के. माने यांना दिल्या.
यावेळी गटनेते शारगंधर देशमुख, नगरसेवक प्रतापसिंह जाधव, माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे, प्रभारी जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी, प्रशिक्षक अजित पाटील व खेळाडू उपस्थित होते.