शहरं
Join us  
Trending Stories
1
Satara Crime: महिला डॉक्टरने थेट सातारच्या डीएसपींनाही फोन केलेला...; आतेभावाच्या आरोपाने खळबळ
2
पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार, बनकर पहाटे सापडला; महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट
3
IND vs AUS : गिलनं पुन्हा गमावला टॉस; युवा ऑलराउंडर दुखापतीमुळे OUT; कुलदीपसह प्रसिद्ध कृष्णाला संधी
4
टाटा मोटर्सचं नाव बदललं, आता 'या' नावाने शेअर बाजारात ओळखली जाणार कंपनी; डिमर्जरनंतर झाला मोठा बदल
5
सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञाला वाचविले; सीआयएच्या माजी अधिकाऱ्याचे सनसनाटी गौप्यस्फोट 
6
SIP Investment: एका वर्षात एसआयपीनं भरला खिसा, मागील दिवाळीनंतर या ५ म्युच्युअल फंडांनी दिला २०% पेक्षा जास्त रिटर्न
7
"सलमान खानसोबत चित्रपट करणार नाही"; महेश मांजरेकरांचं मोठं विधान, म्हणाले- "मी त्याला शिवी..."
8
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
9
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, पतीने पत्नीला कुऱ्हाडीनं कापलं! नंतर पोलीस स्टेशनला जाऊन म्हणाला..
10
आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर...
11
जान्हवी कपूर विवाहबंधनात अडकणार? अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल; लग्नाची तारीख सांगितल्याची चर्चा
12
५ दिवस पुन्हा अवकाळी; उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट
13
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली
15
भारत व्यापार करार दबावाखाली करत नाही; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले
16
लोकपाल सदस्यांना बीएमडब्ल्यू देण्यावरून राजकारण तापले; आता स्वदेशी चळवळीचे काय झाले?
17
कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह
18
“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका
19
“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह
20
बिहार निवडणूक २०२५: दुसऱ्या टप्प्यात १२२ जागा, १३०२ जण रिंगणात; १३७२ उमेदवारांचे अर्ज वैध

Kolhapur Vidhan Sabha Election Result 2024 Live : कोल्हापूर जिल्ह्यात हसन मुश्रीफ, महाडिक, आवाडे,  लाटकर, कोरे, आबिटकर आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 09:29 IST

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. पोस्टल मतांची मोजणी काही ठिकाणी पुर्ण ...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. पोस्टल मतांची मोजणी काही ठिकाणी पुर्ण होवून आता ईव्हीएम मशिनची आकडेवारी हाती आली आहे. सुरुवातीच्या कलानुसार राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कागल मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ यांनी आघाडी घेतली आहे. तर कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांनी आघाडी घेतली आहे.राधानगरीतून शिंदेसेनेचे प्रकाश आबिटकर, इचलकरंजीमधून भाजपचे राहुल आवाडे, कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडिक, शिरोळमधून अपक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर,  शाहूवाडी जनस्वराज्य पक्षाचे विनय कोरे, करवीरमधून काँग्रेसचे राहुल पाटील आघाडीवर आहेत. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीची आकडेवारी समोर येवू लागल्याने कार्यकर्त्यांची घालमेल सुरु झाली आहे.  

इचलकरंजी राहुल आवाडे आघाडीवर इचलकरंजी : इचलकरंजी विधानसभा मतदार संघामध्ये सुरुवाती पासूनच भाजपचे उमेदवार राहुल आवाडे यांनी आघाडी घेतली आहे. चौथ्या फेरी अखेर त्यांनी आपले प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार मदन कारंडे यांच्यापेक्षा ११९७७ मतांची आघाडी घेतली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विठ्ठल चोपडे यांना चौथ्या फेरी अखेर चार अंकी आकडाही गाठता आलेला नाही. चौथ्या फेरी अखेर त्यांना 434 मते मिळाली आहेत. राहुल आवाडे यांनी कोरोची, तारदाळ, खोतवाडी, कबनूर, चंदूर या ग्रामीण भागामध्ये आपला करिष्मा दाखवला आहे. कबनूरच्या एका बूथमध्ये फक्त कारंडे यांना मताधिक्य मिळाले आहे. बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार शमशुद्दीन मोमीन यांनाही आपला करिष्मा दाखवता आलेला नाही.

राधानगरी विधानसभा सहाव्या फेरी अखेर अखेर आबिटकर ८०९२ मतांनी आघाडीवर,

चंदगड विधानसभा मतदारसंघ तिसरी फेरी राजेश पाटील (अजित पवार) १४१२नंदिनी बाभूळकर (शरद पवार) १४००शिवाजी पाटील (भाजप बंडखोर) २४८१अप्पी पाटील (काँग्रेस बंडखोर)- ७४१मानसिंग खोराटे(जनसुराज्य)- २४०भाजपचे बंडखोर शिवाजी पाटील  ३४१६ मतांनी आघाडीवर

कोल्हापूर उत्तर

तिसरी फेरी अखेर मतमोजणी 30603राजेश लाटकर काँग्रेस - 16847राजेश क्षीरसागर शिवसेना - 12986

राज्यातील सर्वाधिक मतदानाच्या २५ मध्ये कोल्हापूरचे पाच मतदारसंघ

  • करवीर ८४.७९ टक्के
  • कागल ८१.७२ टक्के
  • शाहूवाडी ७९.०४ टक्के
  • राधानगरी ७८.२६ टक्के
  • शिरोळ ७८.०६ टक्के

व्यवस्था कशी...?

  • इतक्या मतांची होणार मोजणी : २५,३२,६५७
  • पोस्टल मते किती? : ४२४३०
  • मतमोजणी करणारे एकूण अधिकारी, कर्मचारी
  • २,१५२

१२१ उमेदवार रिंगणात

  • चंदगड १७
  • राधानगरी ०७
  • कागल ११
  • कोल्हापूर दक्षिण ११
  • करवीर ११
  • कोल्हापूर उत्तर ११
  • शाहूवाडी १४
  • हातकणंगले १६
  • इचलकरंजी १३
  • शिरोळ १० 
टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरkagal-acकागलkarvir-acकरवीरradhanagari-acराधानगरीchandgad-acचंदगडichalkaranji-acइचलकरंजीshirol-acशिरोळshahuwadi-acशाहूवाडीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024