शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : अडीच लाख रुपये लाचप्रकरणी कागल तहसीलदारांसह दोन तलाठी अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 19:45 IST

सुळकुड (ता. कागल) येथील जमिनीच्या ७/१२ पत्रिकेवर नाव नोंद करण्यासाठी कागल तहसीलदारांसह दोन तलाठ्यांना अडीच लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कोल्हापूर विभागाने गुरुवारी पकडले.

ठळक मुद्देअडीच लाख रुपये लाचप्रकरणी कागल तहसीलदारांसह दोन तलाठी अटक लाचलुचपत प्रतिबंधक कोल्हापूर विभागाची कारवाई

कोल्हापूर : सुळकुड (ता. कागल) येथील जमिनीच्या ७/१२ पत्रिकेवर नाव नोंद करण्यासाठी कागल तहसीलदारांसह दोन तलाठ्यांना अडीच लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कोल्हापूर विभागाने गुरुवारी पकडले.

महिला तलाठी शमशाद दस्तगीर मुल्लालाचेतील अडीच लाख रुपयांची रक्कम या दोन तलाठ्यांनी कागल तहसीदार कार्यालयात स्वीकारली. तहसीलदार किशोर वसंतराव घाडगे यांच्या सांगण्यावरून ही रक्कम स्वीकारल्याचे तलाठ्यांनी पोलिसांना सांगितले.

मनोज आण्णासो भोजे

तहसीलदार किशोर वसंतराव घाडगे (वय ४४, रा. नागाळा पार्क, कोल्हापूर) महिला तलाठी शमशाद दस्तगीर मुल्ला (४३), मनोज आण्णासो भोजे (४२, दोघे रा. कसबा सांगाव, ता. कागल) असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

तक्रारदार संजय धोंडिराम जगताप (रा. कसबा सांगाव) यांच्याकडून संशयितांनी तीन लाख रुपयांची मागणी केली होती. सुमारे दहा वर्षांपूर्वी कोल्हापूर विक्रीकर भवन येथे अशीच कारवाई झाली होती.याबाबत पोलिसांनी सांगितले की, संजय जगताप यांच्या वडिलांनी सुळकुड येथील जमीन गटनंबर ४४३ मधील ७६ आर. ही जमीन सन २०१२ ला खरेदी केली आहे. या जमिनीचे ७/१२ पत्रकी नांव नोंद होण्यासाठी सुळकुडच्या तलाठी शमशाद मुल्ला हिच्याकडे अर्ज दिला होता. तहसीलदार घाडगे यांची भेट घेतली असून त्यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. ७/१२ पत्रकी नांव नोंद करण्याकरिता मला एक लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी मुल्लाने त्यांच्याकडे केली.

तहसीलदार यांची आता बदली होणार आहे. ते तुमचे काम करून देण्यास तयार आहेत. त्यासाठी त्यांना दोन लाख रुपये असे एकूण तीन लाख रुपयांची मागणी मुल्ला हिने जगताप यांच्याकडे केली.बुधवारी (दि. १६) मुल्ला यांनी घरी कसबा सांगाव येथे भेट घेण्यासाठी जगताप यांना बोलाविले. त्याप्रमाणे एक लाखपैकी ५० हजार रुपये आता द्या व नंतर ५० हजार रुपये द्या, असे सांगून गुरुवारी पैसे घेऊन कागल तहसीलदार कार्यालयात येण्यास त्यांना सांगितले. तत्पूर्वी, जगताप यांनी मंगळवारी (दि. १५) कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्याप्रमाणे पोलिसांनी लाचेची पडताळणी केली असता ती निष्पन्न झाली.त्यामुळे पोलिसांनी कागल तहसीलदार कार्यालयात सापळा रचला. तहसीलदार घाडगे यांनी मुल्ला हिला पैसे स्वीकारण्यास दुजोरा दिल्यावरून व मुल्ला यांच्या सांगण्यावरून तलाठी मनोज भोजे यांनी घाडगे यांच्याकरिता दोन लाख रुपये जगताप यांच्याकडून गुरुवारी स्वीकारले.

त्यानंतर तक्रारदार यांच्याकडून मुल्ला हिने ५० हजार रुपयांची रक्कम कार्यालयाच्या तळमजल्यात स्वीकारली. यावेळी मुल्ला हिने रक्कम स्वीकारून तिच्यासोबत असलेल्या तलाठी मनोज भोजे याच्याकडे ही रक्कम दिली. मुल्ला हिला पोलिसांनी रंगेहात पकडले तर भोजे हा पळून जाऊ लागल्याने पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडले.ही कारवाई पोलीस उपअधीक्षक गिरीष गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारुती पाटील, सहायक फौजदार शामसुंदर बुचडे, पोलीस नाईक आबासाो गुंडणके, संदीप पावलेकर, रुपेश माने, महिला पोलीस कॉन्स्टेबल छाया पाटोळे, पोलीस नाईक विष्णू गुरव आदींनी केली. कागल पोलिसांत गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हाPoliceपोलिस