शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : पळून गेलेल्या चार आरोपीपैकी दोघांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 13:58 IST

शाहूवाडी पोलिस ठाण्यातील कोठडीचे गज वाकवून पळून गेलेल्या चार आरोपीपैकी दोन आरोपींना पकडण्यात कोल्हापूर पोलिसांना शनिवारी सकाळी यश आले. इतर दोघांचा कसून शोध सुरु आहे.

ठळक मुद्देपळून गेलेल्या चार आरोपीपैकी दोघांना पकडलेकोल्हापूर पोलिसांची कारवाई : दोघांचा शोध सुरु

कोल्हापूर : शाहूवाडी पोलिस ठाण्यातील कोठडीचे गज वाकवून पळून गेलेल्या चार आरोपीपैकी दोन आरोपींना पकडण्यात कोल्हापूर पोलिसांना शनिवारी सकाळी यश आले. इतर दोघांचा कसून शोध सुरु आहे.

सूरज सर्जेराव दबडेसह (रा. वाठार, ता. हातकणंगले), गोविंद वसंत माळी, ओंकार महेश सूर्यवंशी (दोघे रा. कासेगांव, ता. वाळवा, जि. सांगली) व विराज गणेश कारंडे (रा. दरवेश पाडळी, ता. हातकणंगले) हे चार आरोपी शुक्रवारी पहाटे शाहूवाडी पोलीस ठाण्यातील कोठडीचे गज वाकवून पळून गेले होते.

दरोडा, घरफोडी अशा गंभीर स्वरूपाचे ३४ गुन्हे दाखल असलेल्या या चारजणांच्या टोळीला कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातून शाहूवाडी पोलिसांनी एका गुन्ह्यात या चौघांना चार दिवसांपूर्वी अटक केली होती.शनिवारी सकाळी ओंकार महेश सूर्यवंशी (दोघे रा. कासेगांव, ता. वाळवा, जि. सांगली) आणि विराज गणेश कारंडे (रा. दरवेश पाडळी, ता. हातकणंगले) या दोन आरोपींना किणी-वाठार जवळ पकडण्यात कोल्हापूर पोलिसांना यश आले आहे. त्यांना पेठवडगाव येथील पोलिस ठाण्यात ठेवले असून सायंकाळी कोल्हापूरात आणण्यात येणार आहे.सूरज दबडे आणि गोविंद माळी यांच्या शोधासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, बेळगांव आदी ठिकाणी पथके रवाना झाली आहे. यामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची व शाहूवाडी पोलीस ठाण्याची प्रत्येकी दोन, कोडोली, पन्हाळा, वडगांव, शिरोळ आदींचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर नाकाबंदी करण्यात आली आहे.दरम्यान, याप्रकरणी सेवा बजावत असलेले सहायक फौजदार विश्वास शेडगे, पोलीस नाईक महेंद्र नामदेव पाटील (बक्कल नंबर ९२०) व श्रीकांत बापू दाभोळकर (बक्कल नंबर १०३५) हे तिघेजण झोपल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. ठाणे अंमलदार पोलीस नाईक सुरेश ढवळे होते.

याचबरोबर पोलीस निरीक्षक अनिल गाडे यांच्यासह अन्य पोलिसांचीही चौकशी होणार आहे. याबाबतचा अहवाल पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील देणार आहेत. कर्तव्यात कसूर ठेवल्याचा ठपका या तीन पोलिसांवर ठेवण्यात आला आहे.दरोडा, घरफोडी अशा गंभीर स्वरूपाचे ३४ गुन्हे दाखल असलेल्या या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गंत (मोक्का)चा प्रस्ताव पाठविला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिसCrimeगुन्हा