कोल्हापूर : शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांना श्रद्धांजली : हिंदुत्ववादी संघटनांतर्फे शोकसभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 16:26 IST2018-03-12T16:26:01+5:302018-03-12T16:26:01+5:30
कांचीकामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानानुसार प्रत्येकाने धर्माचरण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल, अशा भावना रविवारी सायंकाळी मान्यवरांनी व्यक्त केल्या.

कोल्हापूर : शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांना श्रद्धांजली : हिंदुत्ववादी संघटनांतर्फे शोकसभा
कोल्हापूर : कांचीकामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानानुसार प्रत्येकाने धर्माचरण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल, अशा भावना रविवारी सायंकाळी मान्यवरांनी व्यक्त केल्या.
हिंदुत्ववादी संघटनांतर्फे प्रायव्हेट हायस्कूल येथे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
हिंदू जनजागरण समितीचे मधुकर नाझरे यांनी शंकराचार्यांच्या तत्त्वज्ञानानुसार धर्माचरणाची गरज असल्याचे सांगितले.
अॅड. प्रसन्न मालेकर म्हणाले, शंकराचार्यांनी पददलितांसाठी मोठ्या प्रमाणात केलेल्या कार्यामुळे धर्मांतरे थांबली गेली.
शिवसेनेचे किशोर घाटगे म्हणाले, आजही हिंदू धर्मावर आक्रमणे चालू आहेत. त्यासाठी शंकराचार्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे. अॅड. केदार मुनिश्वर म्हणाले, शंकराचार्यांच्या आदर्शानुसार चालणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली आहे.
शिवसेनेचे संभाजी भोकरे म्हणाले, शंकराचार्यांनी पुढाकार घेऊन धर्मांतरे रोखली. हिंदू महासभेचे संजय कुलकर्णी म्हणाले, शंकराचार्यांचे पाठबळ व मार्गदर्शन नेहमीच सर्वांना राहिले आहे. अॅड. सुधीर जोशी म्हणाले, स्वामीजींनी मठाचे कार्य दलितांसाठी पोहोचवून त्यांच्यासाठी देवालये स्थापन केली.
यावेळी भानुदास महाराज, राजू यादव, अशोक रामचंदानी, मयूर तांबे, प्रफुल्ल जोशी, गोविंद देशपांडे, उदय सांगवडेकर, अनिल कुलकर्णी आदी उपस्थित होते.