शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : आंबोलीत विदेशी मद्याची वाहतूक ; व्हॅनचालकांसह तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 14:56 IST

आजरा परिसरात गोवा बनावटीचे विदेशी मद्याच्या वाहतूक करणाऱ्या तमनाकवाडा (ता. कागल) येथील व्हॅनचालकासह तिघांना राज्य उत्पादन कोल्हापूर विभागाच्या भरारी पथकाने मद्यासह पकडले. ही कारवाई बुधवारी (दि.३०) सायंकाळी करण्यात आली.

ठळक मुद्दे आंबोलीत विदेशी मद्याची वाहतूक , व्हॅनचालकांसह तिघांना अटक तीन लाखाचे मद्य, साडेसहा लाखाचा माल जप्त

कोल्हापूर : आजरा परिसरात गोवा बनावटीचे विदेशी मद्याच्या वाहतूक करणाऱ्या तमनाकवाडा (ता. कागल) येथील व्हॅनचालकासह तिघांना राज्य उत्पादन कोल्हापूर विभागाच्या भरारी पथकाने मद्यासह पकडले. ही कारवाई बुधवारी (दि.३०) सायंकाळी करण्यात आली.याप्रकरणी संशयित व्हॅनचालक शरद बाळू कसलकर (वय ३१) , अजित आण्णाप्पा तिप्पे ( २७), सुनील मोहन चौगले ( ३६ , तिघे रा. तमनाकवाडा, चाफा गल्ली, ता. कागल, जि. कोल्हापूर) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून  सुमारे तीन लाखाचे विदेशी मद्य, तीन लाख ५३ हजार ७५० रुपयांची व्हॅन असा सुमारे साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याबाबत पोलिसांनी सांगितले की, आंबोली तपासणी नाक्यावर वाहनांची तपासणी सुरु होती.बुधवारी सायंकाळी सिंधुदूर्ग जिल्हयातील आंबोली (ता. सावंतवाडी) येथून भरधाव वेगाने एक व्हॅन आजऱ्याकडे निघुन गेली. व्हॅनला थांबवण्यास सांगितले असता ती थांबली नाही. संशयावरुन तिचा पाठलाग सुरु केला असता आजऱ्यात व्हॅनला पकडले.

व्हॅनची तपासणी केली असता पाठीमागच्या बाजूस भाजीपाल्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रिकाम्या प्लॅस्टिकचे क्रेट दिसून आले. ही क्रेट व्हॅनमधून उतरत असताना गोवा बनावटीचे विदेशी मद्याचे विविध ब्रॅण्डचे ७५० मिलिचे एकूण ५४ कागदी बॉक्स मिळून आले.

संशयित वाहनचालक शरद कसलकर, अजित तिप्पे व सुनील चौगले हे तिघेजण होते. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले. गोवामधून हे विदेशी मद्य आणल्याचे त्यांनी सांगितले. या कारवाईत विदेशी मद्याचे ५४ बॉक्स, प्लॅस्टिकचे क्रेट व व्हॅन असा सुमारे सहा लाख ५० हजार ८७० रुपयांचा माल मुद्देमाल जप्त करण्यात आला.तिप्पे हा यापुर्वी गोवामधून विदेशी मद्य स्वस्तात खरेदी करुन तो कागल व गडहिंग्लज परिसरा वितरित करत होता. त्याला चार महिन्यापुर्वी अशाच प्रकारच्या गुन्हयात अटक केली होती. ही कारवाई विभागीय उपआयुक्त वाय.एम.पवार, कोल्हापूर जिल्हा अधीक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत निरीक्षक निरीक्षक आर.पी.शेवाळे, दुय्यम निरीक्षक के.बी.नडे, जे.एन.पाटील, जवान एस.डी.जानकर, सचिन काळेल, सागर शिंदे, जय शिनगारे, रवि माळगे, वैभव मोरे यांचा सहभाग होता. तपास नडे करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAmboli hill stationआंबोलि हिल स्टेशनliquor banदारूबंदी