शहाद्यातील म्हसावद येथे 70 हजारांचे अवैध विदेशी मद्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:46 PM2018-04-23T12:46:37+5:302018-04-23T12:46:37+5:30

Seven thousand illegal aliens were seized in Mhasawad of Shahada | शहाद्यातील म्हसावद येथे 70 हजारांचे अवैध विदेशी मद्य जप्त

शहाद्यातील म्हसावद येथे 70 हजारांचे अवैध विदेशी मद्य जप्त

Next

लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 23 : नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे शनिवारी शहादा तालुक्यातील दोन वेगवेगळया ठिकाणी झालेल्या कारवाईत सुमारे 70 हजार रुपयांचा अवैध विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आह़े
म्हसावद ता़ शहादा येथील कुंभारगल्लीत कुडाच्या झोपडीत तसेच खेतीया रोड शहादा येथे एका ढाब्यात अवैध विदेशी मद्याची विक्री होत असल्याची माहिती विभागाला मिळाली़
त्यानुसार विभागाच्या वतीने संबंधित ठिकाणी कारवाई करण्यात आली़ सदर कारवाईत वेगवेगळ्या विदेशी मद्याच्या एकूण 538 बाटय़ा (11 बॉक्स) जप्त करण्यात आले आहेत़ कारवाईत सदर मुद्देमालासह मयुर भिकन पाटील, (रा़ म्हसावद ता़ शहादा) व दिपक रविंद्र शर्मा (रा़ एनआरआय कॉलनी, शहादा) यांच्यावर कारवाई करण्यात आली आह़े दरम्यान, आरोपींच्या ताब्यात मिळून आलेले मद्य एकूण 68 हजार 190 इतक्या किंमतीचे आह़े मुंबई दारुबंदी कायद्यानुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आह़े सदर कारवाई विभागीय उपआयुक्त नाशिक प्रसाद सुव्रे व नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक नितीन घुले यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक मनोज संबोधी, जवान एस़एस़ पवार, नितीन ठणके आदींनी केली़ 
 

Web Title: Seven thousand illegal aliens were seized in Mhasawad of Shahada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.